लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका क्षेत्रात रस्त्यावरील वाहतूक कोंडीने वाहनचालक, नागरिकांना नाहक त्रास होत असतानाच अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला थाटलेल्या गॅरेजमुळे या कोंडीत भरच पडली आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून या गॅरेजवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन पथक व वाहतूक शाखेने संयुक्त कारवाई करून या समस्येचे तड लावावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.महापालिका क्षेत्रात इर्विन चौक, बसस्थानक मार्ग, मोर्शी रोड, इर्विन ते रेल्वे स्टेशन रस्त्यासह पंचवटी व बडनेरा रस्त्यावर ठिकठिकाणी मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या जवळपास दुचाकी, चारचाकी दुरुस्तीची अनेक गॅरेजेस सुरू आहेत. यामुळे रस्ता व्यापून तसेच काही ठिकाणी पदपथांवरही अतिक्रमण केले जात आहे. येथे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गॅरेजचे काम सुरू असते. या गॅरेजमध्ये दुचाकी, चारचाकी वाहने दुरुस्तीसाठी थांबत असल्याने जागा अडून राहते. दिवसभर वाहने उभी असतात. याआधीही नागरिक तसेच माजी नगरसेविका सुजाता झाडे यांनी या मुद्द्यांकडे पालिकेचे लक्ष वेधले होते. मात्र, तरीही महापालिका प्रशासनाने अशा रस्ता अडविणाऱ्या गॅरेजवर कारवाई केलेली नाही. वाहने दुरुस्त करताना आॅईल किंवा अन्य सामान रस्त्यावर टाकले जातात. रस्त्यांवर बेकायदा अतिक्रमण करणाºया तसेच अडथळा ठरणाºया गॅरेजवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.पालिकेच्या स्वच्छता आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून तीन वर्षांपूर्वी याबाबत मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, ही मोहीम काही दिवसांतच गुंडाळण्यात आली. त्यात रस्त्यावर अतिक्रमण करून अस्वच्छता करणाºया व रहदारीस अडथळा ठरणाºया गॅरेजचालकांना दंड ठोठावला होता. त्यावेळीही तोंडदेखल्या कारवाई करण्यात आली.आयुक्तांनी करावी कारवाईआता महापालिका आयुक्तांनी यात लक्ष घालून स्वच्छ अमरावतीच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर असलेल्या या गॅरेजेसवर आळा घालावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. तसेच, चित्रा चौक, रेल्वे स्टेशन मार्गावर जुन्या गाड्यांच्या विक्रीसाठीही रस्त्यांचा वापर होत आहे. गाड्यांचे विक्रेते जुनी वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून त्यावर 'फॉर सेल' असा बोर्ड लावतात. मालविय चौक ते चित्रा चौक या रूंद झालेल्या रस्त्यांच्या कडेला अशा जुने वाहन विक्रीसाठी उभे केल्याचे रोज दिसतात. यामुळे रस्ता अडवला जात आहे. असे चित्र शहरात अन्य ठिकाणीही दिसत असून, बेकायदा महापाालिकेच्या रस्त्यावर अतिक्रमण होत असूनही पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.शवागाराच्या पदपथावर अनधिकृत गॅरेजजिल्हा सामान्य रुग्णालयाकडूृन रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शवविच्छेदनगृहालगत चार ते पाच गॅरेज अनधिकृतपणे थाटण्यात आली आहे. पदपथावर राजरोसमणे हे अतिक्रमण थाटण्यात आले असून, अनेक दुचाकी तथा चारचाकी वाहने त्याठिकाणी असतात. छोट्या टपऱ्यांमध्ये गाडीदुरुस्तीचे साहित्य ठेवून येणाऱ्या वाहनांची दुरुस्ती खुलेआमपणे रस्त्यावरच केली जाते. या अतिक्रमणावर महापालिका यंत्रणेने सोईस्कर दुर्लक्ष केले आहे. सोबतच इर्विनचौकातील परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीच्या पदपठावरसुद्धा अनधिकृतपणे गॅरेजेस चालतात.
फुटपाथवर गॅरेजचे अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 10:34 PM
महापालिका क्षेत्रात रस्त्यावरील वाहतूक कोंडीने वाहनचालक, नागरिकांना नाहक त्रास होत असतानाच अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला थाटलेल्या गॅरेजमुळे या कोंडीत भरच पडली आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून या गॅरेजवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन पथक व वाहतूक शाखेने संयुक्त कारवाई करून या समस्येचे तड लावावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ठळक मुद्देमहापालिका निद्रिस्त : वाहतूक पोलिसांची कारवाईही ढिम्मच