शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

देवरणकरनगरातील अतिक्रमण काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 10:29 PM

देवरणकरनगरातील महापालिकेच्या मैदानावर रघुवीर मोटर्स या गॅरेजचे संचालक प्रोमेंद्र बसरैया यांनी भंगार साहित्य, ट्रक व भंगार आॅटो ठेवून अतिक्रमण केले होते. यासंदर्भाचे वृत्त ‘लोकमत’ने लोकदरबारात मांडताच बुधवारी अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई करून सदर अतिक्रमण हटविले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देवरणकरनगरातील महापालिकेच्या मैदानावर रघुवीर मोटर्स या गॅरेजचे संचालक प्रोमेंद्र बसरैया यांनी भंगार साहित्य, ट्रक व भंगार आॅटो ठेवून अतिक्रमण केले होते. यासंदर्भाचे वृत्त ‘लोकमत’ने लोकदरबारात मांडताच बुधवारी अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई करून सदर अतिक्रमण हटविले.अतिक्रमण निर्मूलन पथकाने आठ ट्रक भंगार साहित्य जप्त केले. यामध्ये १२ भंगार आॅटोरिक्षांचाही समावेश होता. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली. मैदानावर गॅरेजच्या ठेवलेल्या भंगारात पावसाचे पाणी साचून राहते. परिणामी परिसरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. येथे एकाच कुुटुंबातील चौघांना डेंग्यूचे निदान झाल्याने यासंदर्भाची कैफियत नागरिकांनी बडनेऱ्याचे आमदार रवि राणा यांच्याकडे मांडली होती. त्यांनीसुद्धा ही बाब गांभीर्याने घेऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि कारवाईसंदर्भात महापालिका आयुक्त संजय निपाणे यांना सूचना केल्या.महापालिका उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्या आदेशाने अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे, निरीक्षक उमेश सवाई यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहे.आणखी चार डेंग्यू पॉझिटिव्हशहरात आणखी डेंग्यूचे चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर राजापेठ येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. यामध्ये साईनगर परिसरात रहिवासी असलेल्या ३० वर्षीय महिलेला डेंग्यूची लागण झाली. इतर रुग्ण हे साईनगर व नवाथेनगर परिसरातील असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. रुग्णांमध्ये एका बँक कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. मंगळवारी अमरावती शहरात डेंग्यूचे नऊ रुग्ण आढळून आले. दोन दिवसांत डेंग्यूरुग्णांची संख्या ही १३ झाली आहे.