शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

महामार्गावर वृक्षतोड करून अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 11:17 PM

शहरातून धारणी, अंजनगावकडे जाणाºया महामार्गावर रस्त्याच्या कडेला वृक्षतोड करून थेट अतिक्रमण केले जात असल्याचे ......

ठळक मुद्देप्रशासन झोपेत : बिच्छन नदीपात्रातही घुसखोरी

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरातून धारणी, अंजनगावकडे जाणाºया महामार्गावर रस्त्याच्या कडेला वृक्षतोड करून थेट अतिक्रमण केले जात असल्याचे संतापजनक चित्र असून प्रशासनाची डोळेझाक अतिक्रमणधारकांना पाठबळ देणारी ठरली आहे.परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरात पूर्वीच अतिक्रमण काढण्यावरून प्रशासनाची टोलवाटोलवी, राजकारण्यांची मुकसंमती सर्वसामान्यांच्या जीवावर बेतणारी ठरली आहे. नजर जाईल तिकडे अतिक्रमणाचा विळखा नियम धाब्यावर बसविणारा ठरला असताना यातून मोठी दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपालिका प्रशासनाचे कार्य कुठले यावरच शहरातील चौकामध्ये सुरू असणाºया चर्चा बºयाच बोलक्या ठरल्या आहेत. वाहतुकीचा अडथळा होताच पोलीस प्रशासनावर बोट ठेवले जात असताना अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी पालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाची असून यावर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील बैठका वांझोट्या ठरल्या आहेत. रस्त्यांवर अपघाताचे सत्र सुरूच आहे. गतिरोधक नसल्याने जिवीतहानी नसली तरी धूम स्टाईलने भरधाव दुचाकी दामटणाºयांची दादागिरी सर्रास बघायला मिळते.अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या महत्प्रयासाने शहरात बैतूल स्टॉप ते अचलपूर नाक्यापर्यंत इंदूर-अमरावती महामार्गाचे शहराच्या हद्दीत चौपदरीकरणाचे कार्य सुरू आहे. वाघामाता मंदिरापुढेही अतिक्रमण सुरू असल्याने नागरिक संतप्त आहेत.नदीपात्रातही घुसखोरीअतिक्रमणासाठी वाट्टेल त्या शासकीय जागेवर आपला हक्क दाखविण्याची स्पर्धाच जणू शहरात सुरू आहे. लालपूल परिसरातील धारणी मार्गावर बिच्छन नदीपात्रात थेट घुसण्याचा महाप्रताप करण्यात आला आहे. शहरातील अतिक्रमणाचा विळखा अतिक्रमणधारकांसह रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांच्या जिवावर बेतणारा ठरला असताना त्यावर कोण कारवाई करणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.वृक्ष लागवडीचा फायदा काय ?राज्यभर दोन कोटी वृक्ष लागवडीसाठी प्रशासन सामाजिक संस्था एकवटल्या असताना दुसरीकडे दिवसाढवळ्या सुरू असलेली वृक्षतोड पाहता त्यासाठी प्रशासन कुठलीच कारवाही करीत नसल्याने वृक्षतोड करणाºयांचे मनोबल वाढल्याने वृक्षारोपणाचा फायदा काय, असा सवाल आता वृक्षप्रेमी करीत आहे