आॅनलाईन लोकमतअमरावती : सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जिल्ह्यातील ७४२ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. यासाठी मार्च २०१८ पर्यत जिल्हा प्रशासनाने ९०२ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यावर १ कोटी ९८ लाख ७४ हजारांचा निधी खर्च केला जाणार आहे.पाच तालुक्यांमध्ये आताच नागरिकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. तथापि, जिल्हा परिषदद्वारा पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी संभाव्य कृती आराखडा तब्बल महिनाभर उशिरा तयार करण्यात आला. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना चक्क दोन वेळा गंभीर पत्र द्यावी लागली. त्यानंतर कोठे जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभागाला जाग आली.पाच विभागाच्या संयुक्त स्वाक्षरी अहवालानुसार अमरावती तालुक्यात ४९ गावांसाठी १ कोटी १८ लाख ५० हजारांचा खर्च अपेक्षित आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात २३ गावांमध्ये ८० लाख २० हजार, भातकुली तालुक्यात २३ गावांमध्ये ४८ लाख ६० हजार, तिवसा तालुक्यात ३६ गावंमध्ये ७३ लाख ७५ हजार, मोर्शी तालुक्यात २८ गावांमध्ये ५७ लाख ६० हजार, वरूड १२ गावांमध्ये १० लाख ८० हजार चांदुर रेल्वे ३५ लाख ९९ हजार, धामणगाव ६२ लाख ८६ हजार, अचलपूर १ कोटी २ लाख, चांदूरबाजार ७० लाख, अंजनगाव सुर्जी ७६ लाख २० हजार, दर्यापूर ६८ लाख ५० हजार, धारणी ८२ लाख १४ हजार व चिखलदरा तालुक्यात १ कोटी ११ लाख ५० हजार रुपयांचा निधी खर्च होणार आहे.नवीन २९८ विंधन विहिरी करणारजिल्ह्यात या कालावधीत नवीन २९८ विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहेत. यावर २ कोटी ३९ लाखांचा निधी खर्च होणार आहे. यामध्ये धामणगाव तालुक्यात सर्वाधिक ५९, अचलपूर ३२, चिखलदरा ५७, अचलपूर ३२, अंजनगाव सुर्जी २६, मोर्शी २३, तिवसा १७, अमरावती २७, नांदगाव खंडेश्वर १९, तर मोर्शी तालुक्यात २३ विंधन विहिरींचा समावेश आहे. ५८ कूपनलिकांची दुरुस्ती केली जाणार आहे. यावर ७० लाखांचा खर्च होणार आहे.१४७ नळयोजनांची विशेष दुरुस्तीजानेवारी ते मार्च २०१८ अखेर जिल्ह्यात १४७ नळ योजनांची विशेष दुरुस्ती केली जाणार आहे. यावर ४ कोटी १० लाख ५० हजारांचा खर्च केला जाणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात २६, भातकुली १४, तिवसा १८, चांदूरबाजार १२, अंजनगाव सुर्जी १७, दर्यापूर तालुक्यात २३ नळ योजनांची विशेष दुरुस्ती केली जाणार आहे. ७४ तात्पुरत्या नळ योजना करण्यात येणार आहेत. यावर २ कोटी १२ लाखांचा निधी खर्च होणार आहे.
मार्चअखेर ७४२ गावांना टंचाईची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:00 PM
सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जिल्ह्यातील ७४२ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे.
ठळक मुद्दे९०२ उपाययोजनांची मात्रा : दोन कोटींचा निधी प्रस्तावित