उपोषण सुटले : आ. बच्चू कडंूची मध्यस्थीअमरावती : मेळघाटात १५ वर्षे सेवा देणाऱ्या २५३ शिक्षकांना कार्यमुक्त न केल्याने त्यांनी सोमवारपासून जि. प. समोर उपोषण आरंभले होते. रविवारी आ. बच्चू कडू यांनी सीईओंशी चर्चा करून शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांशी संवाद साधला असता उपोषणकर्त्या शिक्षकांना आठवडाभरात कार्यमुक्त करण्याचे आदेश जाणार आहे. यापैकी २१ शिक्षकांना रविवारीच आदेश देण्यात आले. उर्वरित शिक्षकांना २५ आॅक्टोबरपर्यंत आदेश देण्याचे सीईओंनी मान्य केले. त्यानंतर आ. बच्चूृ कडू यांनी उपोषणकर्त्यांना शीतपेय पाजूृन उपोषणाची सांगता केली आहे. जि.प. प्रशासनाने न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून सन २०१५-१६ मध्ये बदली प्रक्रिया राबवून विषय शिक्षकांच्या नेमणुकी अतिरिक्त शिक्षकांचे तालुका व जिल्हास्तरावर समायोजन व मेळघाटात १३ वर्षांपासून कार्यरत २०८ शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या केल्या होत्या. या बदल्यानंतर प्रशासकीय बदलीमध्ये एकास एक या प्रमाणात बदली होऊन सपाटीवरील शिक्षकांनी शासनाची दिशाभूल केली होती. याबाबत न्यायालयाने शासनाच्या बाजूने नुकताच निकाल दिला आहे. त्यामुळे जूनमध्ये केलेली बदली प्रक्रिया ही न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांना आदेश देता आले नाही. ६ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या निर्णयानुसार जिल्हा प्रशासनाने विषय शिक्षक, अतिरिक्त शिक्षक मेळघाटातून प्रशासकीय बदल्या झालेल्या शिक्षकांना आदेश देणे आवश्यक होते. मात्र हा आदेश न दिल्याने मेळघाटातील शिक्षकांनी मागील आठवडाभरापासून उपोषण सुरू केले होते. अखेर यावर आ. कडू यांनी सीईओ किरण कुलकर्णी यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी मेळघाट शिक्षक कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या शिक्षकांना दिवाळीपूर्वी कार्यमुक्त केले जाईल,या आश्वासनावर मेळघाटातील शिक्षकांनी उपोषण मागे घेतले. यासाठी आ. बच्चू कडू, छोटू महाराज वसू, विजय गायकवाड, नितीन लाडीकर, चंद्रकात पिकले, विश्वनाथ जवंजाळ, प्रदीप वडतकर व प्रहारचे पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. यावेळी समितीचे मनिष काळे, सूरज वाघमारे, विकास भडांगे, अनिल वानखडे, दिलीप जावरकर, प्रियदर्शी मेंढे, भूषण बागड, प्रशांत पवार, उमेश आडे अन्य शिक्षकांचा समावेश आहे. यावेळी सीईओ कुलकर्णी, शिक्षणाधिकारी एस.एम. पानझाडे उपस्थित होते.
-अखेर मेळघाटातील शिक्षक होणार कार्यमुक्त
By admin | Published: October 03, 2016 12:11 AM