युवकाला लुटले : अन्य राज्यातही फसवणूक अमरावती : देवाचे प्रत्यक्ष दर्शन घडविण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लुटणाऱ्या चार जणांना शहर कोतवाली पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या टोळीने अमरावती शहरासह अन्य राज्यातील नागरिकांनी लुटल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. रजनीश वीरेंद्रराज दयालचंद (५२, रा. शिवनगर, भोपाळ), राहुल बच्चनलाल कन्नासिया (१९, रा. महादेव घाट, चादुररेल्वे), राजू धनशाम शेंदे्र (२७, खोलापुरी गेट) व मुन्ना पुरणलाल बरे (२६, रा. संजयनगर, भोपाळ) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. महिन्याभरापूर्वी राजकमल चौकात विवेक अशोक खंडारे (२४,रा. साईनगर, दर्यापूर) याला आरोपींनी देवदर्शनाचे आमिष दाखवून मोबाईल, बुट व काही रोख घेऊन पलायन केले होते. या घटनेची विवेक खंडारेने शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक वैजनाथ लटपटे यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे पोलीस कर्मचारी प्रकाश जगताप, कलाम, प्रणय, गजानन यांनी शिताफीने सोमवारी रात्री रजनीश दयालचंद व राहूल कन्नासिया या दोघांना अंबादेवी मार्गावर अटक केली. परप्रांतीयांचीही फसवणूकप्रत्यक्ष देवदर्शनाचे आमिष दाखवून ही टोळी संमोहन क्रियेद्वारे नागरिकांचे मन मोहित करीत होते. त्यानंतर नागरिकांना काही अंतर चालण्याचे सांगून पलायन करीत होते. विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिमसह इंदौर, उज्जैन व अन्य शहरातील नागरिकांना लुटल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
देवदर्शनाच्या नावावर लुटणारी टोळी जेरबंद
By admin | Published: September 02, 2015 12:02 AM