लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत चिरोडी वन वर्तुळातील वरुडा जंगलातील राखीव वनात वनविभागाने वाघाचे वास्तव्य ओळखण्यासाठी 'प्रेशर इंप्रेशन पॅड'ची उपाययोजना केली आहे. राखीव वनात वाघाचे स्थलांतर झाले की नाही, याची खात्री होण्यासाठी वनक्षेत्रात सात किमीच्या परिसरात दहा पॅड तयार करण्यात आले आहे.चांदूररेल्वे वनपरिक्षेत्राधिकारी आशिष कोकाटे यांच्या मार्गदर्शनात वनविभागामार्फत पाचशे मीटरच्या अंतरात १० प्रेशर इंप्रेशन पॅड लावण्यात आलेले आहेत. पॅडची लांबी सात फूट व रुंदी ३ फूट असून, यामुळे वाघाच्या पाऊलखुणाद्वारे त्याच्या अस्तित्वाची ओळख पटण्यास मदत होणार आहे. त्या पॅडची दरदिवशी वनरक्षक नोंद घेत आहे. पोहरा, चिरोडी, माळेगाव व बडनेरा वनवर्तुळातील वनरक्षक लोकेशनसाठी सज्ज असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी कोकाटे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
वाघाच्या आगमनाची प्रेशर इंप्रेशन पॅडने खात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 10:43 PM
चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत चिरोडी वन वर्तुळातील वरुडा जंगलातील राखीव वनात वनविभागाने वाघाचे वास्तव्य ओळखण्यासाठी 'प्रेशर इंप्रेशन पॅड'ची उपाययोजना केली आहे. राखीव वनात वाघाचे स्थलांतर झाले की नाही, याची खात्री होण्यासाठी वनक्षेत्रात सात किमीच्या परिसरात दहा पॅड तयार करण्यात आले आहे.
ठळक मुद्देपडताळणी : पोहरा, चिरोडी जंगलात पॅड