शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

जड वाहनांना प्रवेश बंदीच

By admin | Published: February 15, 2016 12:32 AM

अपूर्वा देऊळगावकर हिच्या अनपेक्षित आणि दुर्दैवी मृत्यूनंतर शहर हादरले. महापालिकेसह पोलिसांवरही ताशेरे ओढले गेले. नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

अपूर्वाच्या मृत्यूचे पडसाद : ‘ट्रॅफीक स्टेटस रिपोर्ट’ची तयारी अमरावती : अपूर्वा देऊळगावकर हिच्या अनपेक्षित आणि दुर्दैवी मृत्यूनंतर शहर हादरले. महापालिकेसह पोलिसांवरही ताशेरे ओढले गेले. नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या अपघाताने खडबडून जागे झालेल्या महापालिका व पोलिसांनी गद्रे चौक ते गांधी चौक मार्गावरील दीपार्चनजवळ लोखंडी बारसह ‘जड वाहनास प्रवेश बंदी’चे फलक लावले आहेत. शहरातील इतरही संवेदनशील भागात असे फलक लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक वर्षांपासून शहरातील नागरिक व वाहन चालक या समस्येला तोंड देत आहेत. अलीकडे शहराचा विस्तार वाढला आहे. पार्किंग स्थळांचा अभाव, रस्त्यावरील अतिक्रमण तसेच नियोजनाच्या अभावामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. शहराची लोकसंख्या आठ लाखांच्या घरात असली तरी रस्त्यांची संख्या तेवढीच आहेत. शहरात रोज तीन लाखांपेक्षा वाहने चालतात. वाढलेली लोकसंख्या आणि वाहनांची बेसुमार वाढ पाहता रस्ते ‘जैसे थे’ आहेत. वाहतूक नियमन ही पोलीस खात्याची आणि महापालिकेची संयुक्त जबाबदारी आहे. मात्र, येथेच नेमकी बोंबाबोंब आहे. नियमदर्शक फलक लावण्यासह रस्त्यांवर पट्टे अंकित करणे, नो पार्किंग झोन, पार्किंग झोन ठरविण्याची जबाबदारी पालिकेची. मात्र, नियोजन आणि दूरदृष्टीचा अभाव आहे. बहुतांश रस्ते अतिक्रमणामुळे अरूंद झाले आहेत. नियमांचे उल्लंघन करण्याची फॅशनवाहन चालविताना प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. स्वत:सह इतरांच्याही जीवाची काळजी घेतल्यास अपघात टाळता येतात. पण, आजकाल वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे ही फॅशन बनली आहे. वाहतूक नियमांचे पालन करण्याची प्रवृत्ती वाढविणे ही काळाजी गरज आहे.