शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचे ‘थर्मल स्क्रिनिंग’नंतर ‘एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 5:00 AM

राज्य आणि राज्याबाहेर ये-जा करण्यासाठी बडनेरा रेल्वे स्थानकाहून सर्वाधिक गाड्या धावत आहेत. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रेल्वे स्थानकावर बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश निर्गमित केले आहे. मात्र, गत दोन महिन्यांपासून रेल्वे स्थानकावर कोरोना तपासणी गायब झाल्याचे चित्र आहे. दिवाळीनंतर रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. अशातच कोरोना चाचणी होत नसल्याने जिल्ह्यात बाहेर गावाहून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांपासून संसर्गाचा धोका बळावला आहे.

ठळक मुद्देकोरोना तपासणी पथक गायब, बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशाकडून संक्रमणाचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना नवे रूप घेऊन येणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्धारावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी आवश्यक आहे. मात्र, बडनेरा रेल्वे स्थानकावर थातूरमातूर ‘थर्मल स्क्रिनिंग’ करण्यात येत आहे. काही प्रवासी ही चाचणीसुद्धा न करता आवागमन करीत आहे. मात्र, हा सर्व प्रकार रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस उघड्या डोळ्यांनी बघत आहे.राज्य आणि राज्याबाहेर ये-जा करण्यासाठी बडनेरा रेल्वे स्थानकाहून सर्वाधिक गाड्या धावत आहेत. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रेल्वे स्थानकावर बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश निर्गमित केले आहे. मात्र, गत दोन महिन्यांपासून रेल्वे स्थानकावर कोरोना तपासणी गायब झाल्याचे चित्र आहे. दिवाळीनंतर रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. अशातच कोरोना चाचणी होत नसल्याने जिल्ह्यात बाहेर गावाहून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांपासून संसर्गाचा धोका बळावला आहे. रेल्वे स्थानकावर महापालिका व मलेरिया विभागाची चमू प्रवाशांचे ‘थर्मल स्क्रिनिंग’ करीत आहे. प्रवाशांना दोन ते तीन मिनिटांत तापमान तपासून बाहेरील रस्ता दाखविला जात आहे. परिणामी  कोरोना चाचणी होत नसल्याने रेल्वे प्रवाशांची अलीकडे बल्ले बल्ले आहे.

दोन ते तीन मिनिटांतच प्रवासी मुक्तरेल्वे स्थानकावर कोरोना चाचणी होत नाही. त्यामुळे ‘थर्मल स्क्रिनिंग’ होताच दोन ते तीन मिनिटांतच रेल्वे प्रवाशांची तपासणी होऊन ते मुक्त होत असल्याचे वास्तव आहे. कोरोना चाचणीची भानगड नाही. त्यामुळे प्रवाशांचा फारसा वेळ जात नाही. हात किंवा कपाळावर तापमान तपासून पुढे प्रवास करता येत असल्याचे वास्तव आहे.

कोरोना चाचणीसाठी ना टेबल, ना कर्मचारीअमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावरील कोरोना चाचणी पथक गायब झाले आहे. बडनेरा रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात टेबल ठेवण्यात आला आहे. परंतु, येथे कोरोना चाचणी होत नाही. केवळ ‘थर्मल स्क्रिनिंग’ करुन प्रवाशांना सोडले जात असल्याचे वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे संसर्ग कसा रोखणार, हा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांमार्फत कोरोना संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :railwayरेल्वेCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या