लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : ‘लॉकडाऊन’ झुगारून मुंबईतून खासगी वाहनाने १३ व्यक्ती बडनेºयात आल्याने शहरात भीतीचे वातावरण तयार झाले. या सर्वांचे थर्मल स्क्रीनिंग मोदी दवाखान्यात करण्यात आले. एंट्री चेक पॉइंटला आता अधिक सतर्क राहावे लागणार आहे, अन्यथा जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना ही झुंबड अपयशी ठरवेल, असे चित्र आहे.खासगी वाहनांनी मोठ्या संख्येने लोक गावाकडे परत येत आहेत. लॉकडाऊनला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. शासनाने आहे तिथेच थांबा, घराबाहेर पडू नका, अशा सूचना दिल्यावरही मोठ्या संख्येत लोक पळवाटा शोधत आहेत. अशाच प्रकारे २७ मार्च रोजी १३ जण मुंबईतून बडनेऱ्यात आले. मोदी दवाखान्यात या सर्वांची थर्मल स्क्रीनिंग झाल्यावर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले. एका नगरसेवकाने या सर्वांच्या पाठीशी राहून बरीच धावपळ केली. त्यांच्या घरीच तपासणी करा, असा आग्रहदेखील या नगरसेवकाने प्रशासनाकडे केला होता. मात्र, शहरासाठी ही सहृदयता किती धोकादायक ठरू शकते, याचादेखील विचार झाला पाहिजे, अशी जनभावना याप्रकरणी व्यक्त होत आहे.बडनेºयात वैद्यकीय विभागाची काळजी लोंढ्यामुळे वाढली आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन एकही कोरोनाबाधित रुग्ण असू नये, यासाठी जिवाचे रान करून प्रयत्न करीत आहे. २८ मार्च रोजीदेखील मोठ्या संख्येत ट्रकने जाणारे बडनेरा शहराच्या आऊटरला पकडण्यात आले. चार दिवसांपूर्वीदेखील नाशिकहून ३२ लोक आले होते. चेकपॉइंट तसेच महामार्गावरील पेट्रोलिंग अधिक सतर्क करावी, अशी शहरवासीयाकडून मागणी होत आहे.बडनेºयातील पाच परतले परदेशातूनबडनेरा शहरातीलच पाच जण परदेशातून परत आल्याचे प्रशासनाने सांगितले. या सर्वांचा क्वारंटाइन कालावधी संपला आहे. त्यांना कुठलीच बाधा नव्हती. तथापि, त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष दिले जात आहे. ५८ जण मुंबई, पुण्याहून घरी परत आलेले आहे. लपूनछपून आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. लोकांनी याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन केले जात आहे.रेल्वे थांबवून उपयोग काय; झुंबड सुरूचकोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी प्रवासी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. पण, ट्रक व इतर वाहनांनी बडनेऱ्यात झुंबड दाखल होत आहे. संचारबंदीचा नियम तोडला जात आहे. बाहेरून येणाऱ्यांकडून संसर्गाची भीती व्यक्त होत आहे. अशांवर कठोर कारवाई करा, अशी मागणीदेखील पुढे येत आहे.
‘लॉकडाऊन’ झुगारून बडनेऱ्यात ‘एंट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 6:00 AM
खासगी वाहनांनी मोठ्या संख्येने लोक गावाकडे परत येत आहेत. लॉकडाऊनला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. शासनाने आहे तिथेच थांबा, घराबाहेर पडू नका, अशा सूचना दिल्यावरही मोठ्या संख्येत लोक पळवाटा शोधत आहेत. अशाच प्रकारे २७ मार्च रोजी १३ जण मुंबईतून बडनेºयात आले. मोदी दवाखान्यात या सर्वांची थर्मल स्क्रीनिंग झाल्यावर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले.
ठळक मुद्देशहर धास्तावले : मुंबईतून १३ जण आले