शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

डेंग्यूची ‘एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 10:56 PM

जुलैच्या पहिल्या तीन दिवसांत शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये सात रुग्णांची डेंग्यूसंशयित म्हणून नोंद करण्यात आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यू या कीटकजन्य आजाराचे संक्रमण होत असते. यंदाही या आजाराची लक्षणे आढळलेल्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना दिसत आहे. दरम्यान, शहरातील खासगी रुग्णालयात डेंग्यूसदृश म्हणून उपचार घेत असलेल्या सात रुग्णांचे रक्तजलनमुने तपासणीसाठी यवतमाळ येथील सेंटिनल सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात साथ पसरण्याची भीतीतीन दिवसांत सात रुग्ण : खासगी रुग्णालयात संख्या वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जुलैच्या पहिल्या तीन दिवसांत शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये सात रुग्णांची डेंग्यूसंशयित म्हणून नोंद करण्यात आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यू या कीटकजन्य आजाराचे संक्रमण होत असते. यंदाही या आजाराची लक्षणे आढळलेल्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना दिसत आहे. दरम्यान, शहरातील खासगी रुग्णालयात डेंग्यूसदृश म्हणून उपचार घेत असलेल्या सात रुग्णांचे रक्तजलनमुने तपासणीसाठी यवतमाळ येथील सेंटिनल सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.जून महिन्यात एकूण १४ डेंग्यूसदृश रुग्णांचे रक्तजलनमुने घेण्यात आले. जुलैच्या पहिल्या तीन दिवसांत सात रुग्णांना डेंग्यूची बाधा झाली असल्याचे निदान करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सात डेंग्यूसदृश रुग्णांमध्ये डॉ. मनोज निचत यांच्याकडे चार, दयासागरमध्ये दोन, तर एक रुग्ण डॉ. अजय डफळेंकडे दाखल आहे. हे सातही रुग्ण गणेशनगर, ज्योती कॉलनी, चक्रधरनगर, नवाथेनगर, नवी वस्ती बडनेरा व महालक्ष्मीनगर येथील रहिवासी आहेत. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाने १ जानेवारी ते २ जुलैपर्यंत एकूण ३० संशयित रुग्णांचे सिरम सॅम्पल जिल्हा हिवताप अधिकारी यांच्यामार्फत यवतमाळला पाठविले असून, १२ डेंग्यू निगेटिव्ह आढळून आले. १८ रुग्णांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. दरम्यान, अवघ्या दोन दिवसांत डेंग्यूचे सात रुग्ण संशयित आढळल्याने साथीची भीती व्यक्त होत आहे.लागण कशी होते?स्वच्छ, साचलेल्या पाण्यात अंडी घालणारा एडीस इजिप्ती हा डास डेंग्यूचे विषाणू पसरवतो. हे डास शक्यतो सकाळी व संध्याकाळी चावतात. पावसाळ्यानंतर तापमानात होत असलेल्या चढ-उतारांमध्ये डेंग्यूच्या विषाणूंची संख्या वाढते आणि त्यामुळे संसर्ग होण्याचे प्रमाणही वाढते. डासांनी वहन करून आणलेल्या विषाणूंशी लढण्यास शरीराची प्रतिकारशक्ती कमी पडली की, डेंग्यूची लागण होते.लक्षणेडेंग्यूची लक्षणे ही सर्वसामान्य विषाणू संसर्गाप्रमाणेच असतात. मात्र, काही वेळा दोन-तीन दिवसांनी ताप उतरला की, असह्य डोकेदुखी होऊ लागते. उलट्या होतात. अंग मोडून येते, सूज येते. डेंग्यूच्या तापामध्ये सांधे दुखतात. अंगावर चट्टेही उठतात.साचलेले पाणी काढून टाकाघरात पाण्याचा साठा केल्यास या डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे पावसाळ्यात पाणी साचून त्यात हे डास वाढतात. उन्हाळ्यात कूलरच्या पाण्यातही हे डास वाढू शकतात. घर व परिसरात डास होणार नाहीत, याची काळजी घेतल्यास डेंग्यू व मलेरिया या आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. हे डास दिवसा चावत असल्याने दिवसादेखील डासांपासून संरक्षणाची गरज असते .तीन दिवसांत खासगी रुग्णालयात डेंग्यूसंशयित म्हणून सात रुग्णांची नोंद झाली. त्या सातही रुग्णांचे रक्तजलनमुने परीक्षणासाठी पाठविण्यात आले. डेंग्यूची साथ आटोक्यात आहे. महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत.- डॉ. सीमा नैताम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका