पान ३
चांदूरबाजार: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या श्री क्षेत्र नागरवाडी येथे सोमवारी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते भगवान शिवशंकराच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी अनिल देशमुख व अतुल रेळे यांनी शंकराच्या मुर्तीकरीता देणगी स्वरुपात मदत केली. गाडगेबाबांच्या संदेशाप्रमाणे मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातील गोरगरीब आदिवासी, वनवासी बांधवांची ५०० विद्यार्थी दरवर्षी श्री गाडगे महाराज आश्रमशाळा नागरवाडी येथे मोफत शिक्षणाचा लाभ घेत आहेत. या कार्यक्रमाला हभप भरत रेळे, मंगेश देशमुख, बाळासाहेब देशमुख, प्रकाश महात्मे, गजानन जवंजाळ, हरिभाऊ मोगरकर, सुनिल मोहोड, प्रफुल नवघरे तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सेवक मंडळी उपस्थित होती.