शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

अखेर चांदूरला मिळाला रेल्वे थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:14 PM

अनेक निवेदने, मोठे जनआंदोलन, रेल्वे प्रशासनाला बेशरमचे झाड भेट, नागपूर मध्य रेल्वे कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा अशा रेल रोको कृती समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन चांदूर येथे रेल्वे थांबा मंजूर करण्यात झाली आहे.

ठळक मुद्देरेल रोको कृती समितीच्या प्रयत्नांना यश : इंटरसिटी, जबलपूर एक्सप्रेस २६ फेब्रुवारीपासून थांबणार

आॅनलाईन लोकमतचांदूररेल्वे : अनेक निवेदने, मोठे जनआंदोलन, रेल्वे प्रशासनाला बेशरमचे झाड भेट, नागपूर मध्य रेल्वे कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा अशा रेल रोको कृती समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन चांदूर येथे रेल्वे थांबा मंजूर करण्यात झाली आहे. अमरावती-अजनी इंटरसिटी एक्स्प्रेस व अमरावती-जबलपूर एक्स्प्रेसची चाके २६ फेब्रुवारीपासून रेल्वे स्टेशनवर थांबणार आहेत. याबाबतचे पत्र मंगळवारी रेल रोको कृती समितीचे नितीन गवळी यांना आॅनलाइन प्राप्त झाले. यामुळे तालुक्यात सगळीकडे आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे. यामध्ये खासदार रामदास तडस यांचेही मोठे योगदान आहे.चांदूरवासीयांची रेल्वे थांब्याची अनेक वर्षांपासून मागणी होती. शहराच्या आजूबाजूने जवळपास ५०-६० खेडी आहेत. तिवसा, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नागरिकसुद्धा चांदूररेल्वे स्टेशनवरून प्रवास करतात. सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना थांबा मिळण्यासाठी सर्वप्रथम माजी आमदार दिवंगत पांडुरंग ढोले यांनी प्रयत्न चालविले होते.यानंतर रेल रोको कृती समितीने पांडुरंग ढोले, नितीन गवळी यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने झालीत. ज्या दिवशी ढोले यांचे निधन झाले, त्या दिवशी ते थांब्यासंबंधी चर्चा करण्यासाठी रेल्वे कार्यालयात जाणार होते. त्यांच्या निधनानंतर ही लढाई थांबू न देता नितीन गवळी यांनी आजपर्यंत सुरू ठेवली. या सगळ्यांच्या प्रयत्नानंतर अखेर चांदूररेल्वे स्टेशनवर अमरावती-अजनी इंटरसिटी व अमरावती-जबलपूर एक्स्प्रेसला थांबा मिळाला आहे. नितीन गवळी व सहकाºयांनी रेल्वे मंत्रालयात माहितीच्या अधिकारात ३ आॅक्टोबरला हजारो शहरवासीयांच्या स्वाक्षरीचे निवेदन मंत्रालयात दिले होते. रेल रोको कृती समितीच्या मागणीवर मंगळवार, २० फेब्रुवारीला रेल्वे मंत्रालयाने दोन्ही गाड्यांंना २६ फेब्रुवारीपासून थांबा मिळाल्याचे उत्तर दिले. त्यामुळे आता दोन्ही रेल्वे गाड्या २६ फेब्रुवारीपासून चांदूररेल्वेत थांबणार आहेत. यामुळे आता प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. या थांब्यासाठी खासदार रामदास तडस यांनीसुद्धा रेल्वे मंत्री, रेल्वे महाव्यवस्थापक यांना स्वत: भेटून पाठपुरावा केला होता, हे विशेष.रेल रोको कृती समितीचे प्रयत्नसमितीचे नितीन गवळी, महमूद हुसेन, क्रांतिसागर ढोले, विनोद जोशी, रामदास कारमोरे, बंडू यादव, विजय रोडगे,विनोद लहाने, अरुण बेलसरे, राजाभाऊ भैसे, अजय चुने, पंकज गुडधे, संजय डगवार, भीमराव खलाटे, महादेव शेंद्रे, गौतम जवंजाळ, अवधूत सोनवने, सुधीर सव्वालाखे, सौरभ इंगळे, नीलेश कापसे यांनी प्रयत्न केलेफटाक्यांच्या आतषबाजीने आनंदोत्सवअमरावती-जबलपूर एक्स्प्रेस व अमरावती-अजनी इंटरसिटी एक्स्प्रेसचा थांबा मंजूर झाल्याचे पत्र येताच मंगळवारी सायंकाळी रेल रोको कृती समितीतर्फे स्थानिक जुना मोटार स्टँड येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. याचवेळी छोटेखानी कार्यक्रमात सर्वप्रथम रेल्वे थांब्याचे नेतृत्व करणारे पांडुरंग ढोले यांच्या प्रतिमेस हारार्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले.चांदूररेल्वे शहराला विदर्भ सुपरफास्ट एक्स्प्रेसचा थांबा मिळवून दिल्यानंतर पांडुरंग ढोले यांनी इंटरसिटी व जबलपूर एक्स्प्रेसच्या थांब्यासाठी प्रयत्न केले होते. रेल रोको कृती समितीच्या माध्यमातून थांबा मिळाल्याने ही त्यांना श्रद्धांजली.- नितीन गवळी,सदस्य, रेल रोको कृती समितीचांदूररेल्वे येथे इंटरसिटी व जबलपूर एक्स्प्रेस या जलद रेल्वे गाड्यांना रामदास तडस यांच्या प्रयत्नाने थांबा मिळाला असल्याने त्यांचे धामणगाव मतदारसंघाचा आमदार म्हणून जाहीर स्वागतच करू.- वीरेंद्र जगताप,आमदार