मुख्यमंत्र्यांकडून दखल : आरोग्य यंत्रणेला दिले आदेशअमरावती : स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालय (इर्विन) येथील सीटीस्कॅन, एमआरआय सेवा, एक्स रे मशिन, सोनोग्राफी मशिन मागील काही वर्षांपासून बंद असल्याने गोरगरीब रूग्णांची गैरसोय होत होती. याकडे ‘लोकमत’ने २८ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन हा प्रश्न तातडीने सोडविणार असल्याची घोषणा अमरावतीत केली.शासनाने गरीब, गरजू रुग्णांना सीटीस्कॅन, एमआरआय सेवा कमी दरात उपलब्ध व्हावी म्हणून अमरावतीसह २२ जिल्ह्यांतील सामान्य रुग्णालयांत ही यंत्रणा बसविण्याचे आदेश दिले. त्यासाठी खासगी कंपनीला कंत्राटी दिले. मात्र अमरावती व इतर २१ जिल्ह्यात ही यंत्रणा अजूनही कार्यान्वित झाली नाही. त्यामुळे अमरावती येथील जिल्हा सामान्य रूग्णालयावर खासगी रूग्णालयाचे एका वर्षात सुमारे १५ लाख रूपयांचे कर्ज झाले होते. आरोग्याशी निगडीत या महत्त्वाच्या प्रश्नावर ‘लोकमत’ने लक्ष वेधताच आमदार सुनील देशमुख यांनी जिल्ह्यातील गोरगरीब रूग्णांच्या हिताचा हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला. जिल्हा रुग्णालयातील सीटीस्कॅन, एमआरआय सेवा, एक्स-रे मशिन, सोनोग्राफी मशिन बंद असल्याने रूग्णाची गैरसोय होत होती.
अखेर इर्विनमधील बंद सीटीस्कॅन, एमआरआय यंत्रणेचे ग्रहण सुटणार
By admin | Published: November 29, 2014 11:12 PM