महिला, नागरिकांचा जल्लोष : आयुक्तांचे आभारअमरावती : स्थानिक रामपुरी कॅम्प येथील महापालिका जागेवरील अतिक्रमित देशी दारूचे दुकान आयुक्तांच्या आदेशान्वये पाडण्यात आले. यावेळी परिसरातील महिला व नागरिकांनी जल्लोष करीत आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांचे आभार व्यक्त केले. स्थानिक रामपुरी कॅम्प, सिद्धार्थनगर, भीमनगर, सिव्हील लाईन येथे अनेक वर्षांपासून मनपाच्या बगिच्यालगत अतिक्रमित जागेत देशी दारूचे दुकान थाटले होते. याच दुकानासमोर शाळा असून बाजूला बुद्धविहार व सार्वजनिक वाचनालय आहे. त्यामुळे हे दुकान हटविण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते अनिल वरघट यांच्या नेतृत्वात महिला संघर्ष समितीद्वारे अनेक वेळा आंदोलन, मोर्चे काढून निवेदन देण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांनी त्वरित कार्यवाही करून हे दुकान हटविले. यावेळी बेबीताई भगत, पद्माताई तायडे, सुवर्णा प्रधान, चक्रे, वैजंतीबाई देवळेकर, शालू धाकडे, रत्ना गणेश, नाईक, वनमाला मकेश्वर, गायगोले, चोपडे, सावळे व महिलांसहनागरिकांनी जल्लोष केला.
अखेर रामपुरी कॅम्प येथील देशी दारूचे दुकान उद्ध्वस्त
By admin | Published: November 30, 2015 12:28 AM