लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महिनाभरापूर्वी चांदूर रेल्वे मार्गावर अज्ञात चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार, एक महिला गंभीर जखमी झाली. या अपघाताविषयी काही धागेदोरे नसतानाही फ्रेजरपुरा पोलिसांनी प्रत्येक बाबी लक्षात घेत गुप्तहेरांकडून माहिती गोळा केली. या गुन्ह्याचा छडा लावला. रविवारी फ्रेजरपुऱ्याचे पोलीस उपनिरीक्षक अयुब शेख यांनी चालक अजय खेमराज पवार (२३,रा.चिरोडी) या आरोपीला अटक केली.२९ डिसेंबर रोजी चांदूर रेल्वे मार्गावर घडलेल्या अपघातात एमएच ०४ सीटी-४१५८ हा कार क्रमांक पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी आरटीओमार्फत वाहनांची माहिती काढली असता, ते वाहन मुंबईच्या उल्हासनगरातील निघाले. पोलिसांनी मुंबई जाऊन वाहनचालकाची चौकशी केली असता, ते वाहन अमरावतीत आलेच नसल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी गुप्त हेरांकडून माहिती काढली असता, चिरोडी गावातील विजय जाधव यांच्या मालकीच्या एमएच २७ बीई ६४७० क्रमांकाच्या चारचाकीने अपघात झाल्याची माहिती पुढे आली. त्याआधारे पोलिसांनी चालक अजय खेमराज पवारचा शोध सुरू केला. पोलिसांनी रविवारी दुपारपासून बसस्थानक व कॅम्प कॉर्नरजवळ सापळा रचला. त्यात सायंकाळच्या वेळेत चालक अजय पवार अडकला. पोलिसांनी अजय पवारसह त्याच्याजवळील चारचाकी वाहन ताब्यात घेतले. पोलिसांनी वाहन मालकालाही चौकशीकरिता बोलाविले होते.पीएसआय अयुब शेख यांचे यशस्वी डिटेक्शनपीआय आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अयुब शेख, शिपाई दिनेश मिश्रा, सुरेंद्र इंगोले, विनय गुप्ता, शेखर गायकवाड यांनी हा गुन्हा उघड केला. अयुब शेख यांनी फे्रजरपुरा हद्दीतील ८६ अपघातांच्या गुन्ह्यांपैकी ७४ गुन्हे उघडकीस आणले आहे. यापूर्वी अयुब शेख यांनी गुन्हे शाखेत चोख कर्तव्य बजावले आहे. नागपुरी गेट हद्दीतील गुन्हेगारांकडून तीन देशी कट्टे जप्त केले होते.अशी आहे घटना२९ डिसेंबर रोजी सुरेश महादेव कवटकर (४५), जगदीश मधुकर वाकोडे (४५) व सीमा प्रफुल्ल लवणकर (४६, तिघे रा. हनुमाननगर) हे एमएच २७ बीजी ४५८२ क्रमांकाच्या दुचाकीने चांदूर रेल्वेहून अमरावतीकडे येत होते. त्यावेळी नंदनवन ढाबा ते टोपाज हॉटेलदररम्यानच्या मार्गावर त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात चारचाकीने धडक देऊन पलायन केले. या अपघातात सुरेश कवटकर व जगदिश वाकोडे ठार झाले, तर सीमा लवणकरही गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी अज्ञात वाहनाचालकाविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३०४ (अ), १३४, १९४ अन्वये गुन्हा नोंदविला.
अखेर ‘त्या’ वाहनचालकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 11:05 PM
महिनाभरापूर्वी चांदूर रेल्वे मार्गावर अज्ञात चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार, एक महिला गंभीर जखमी झाली. या अपघाताविषयी काही धागेदोरे नसतानाही फ्रेजरपुरा पोलिसांनी प्रत्येक बाबी लक्षात घेत गुप्तहेरांकडून माहिती गोळा केली. या गुन्ह्याचा छडा लावला. रविवारी फ्रेजरपुऱ्याचे पोलीस उपनिरीक्षक अयुब शेख यांनी चालक अजय खेमराज पवार (२३,रा.चिरोडी) या आरोपीला अटक केली.
ठळक मुद्देफ्रेजरपुरा पोलिसांची कामगिरी : चांदूर रेल्वे मार्गावरील अपघातात दोन ठार