समन्वय बैठक : कलेक्टर, सीपींची उपस्थितीअमरावती : स्थानिक इर्वीन चौक सौंदर्यीकरणासाठी प्रस्तावित ‘उडता घोडा’ हे शिल्प साकारण्यास नकार असल्याचे समन्वय बैठकीत बुधवारी निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे काहीे दिवसांपासून सुरु असलेल्या या वादावर पडदा पडला, हे विशेष.येथील कलावंत विजय राऊत यांनी उडता घोडा हे अप्रतिम शिल्प साकारले होते. इर्वीन चौकात सदर शिल्प बसविण्यासाठी प्रक्रिया सुरु केली होती. मात्र इर्वीन चौकात उडता घोडा हे शिल्प साकारु नये, अशी भूमिका आंबेडकरी अनुयायांनी घेतली होती. दरम्यान विभागीय आयुक्त कार्यालयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या नेतृत्वात दादासाहेब क्षिरसागर, सुरेश तायडे, हरिदास सिरसाट, सत्यजीत बागडे, सचिन वैद्य, राहूल मोहोड यांनी बेमुदत उपोषण सुरु केले. या शिल्पमुळे वाद निर्माण होत असल्याने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या पुढाकाराने बुधवारी समन्वय बैठक घेतली. या बैठकीला पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, कमलताई गवई, मोहन पातुरकर, सोमनाथ शेटे, पप्पू पाटील, बांधकाम विभागाचे जाधव, मधूकर अभ्यंकर, सुनील गजभिये, समाधान वानखडे, गजानन वानखडे, अनिल गोंडाने, पी. एस. खडसे, सविता भटकर, सुधीर तायडे, जीवन सदार, राजू गवई आदी उपस्थित होते. यावेळी उडता घोडा हे शिल्प असून कुणी नकार देत असेल तर कलावंत हे शिल्प देणार नाही, अशी भूमिका पप्पू पाटील यांनी घेतली. त्यामुळे हे शिल्प देत नसल्याचे स्पष्ट केले.वाद निर्माण होत असल्यामुळे सदर कलावंताने हे शिल्प देण्यास नकार दर्शविला आहे. विरोध, उपोषणामुळे कलावंतांची भावना दुखावल्याची बाब समोर आली आहे. समन्वय बैठकीतील निर्णयानुसार हे शिल्प आता त्या जागेवर साकारले जाणार नाही.- किरण गित्ते, जिल्हाधिकारी,
अखेर ईर्वीन चौकात ‘उडता घोडा’ शिल्प नाहीच
By admin | Published: September 29, 2016 12:15 AM