रोज असते ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती
जिल्ह्यातील १५८३ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत.या शाळांमध्ये १४ शिक्षक ५९६८ शिक्षक कार्यरत आहेत. शाळा बंद असल्या तरी ५० टक्के शिक्षकांना शाळेत जावे लागते.खासगी शाळेतील शिक्षकांची उपस्थिती पूर्ण असल्याचे दिसृून येते.तर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक हे अल्टनेट डे येत असल्याचे अनेक गावांतील नागरिकांनी सांगितले.
कोट
जिल्हा परिषदेच्या सध्या ८ ते बारावीपर्यतचे वर्ग सुरू आहेत.तर प्राथमिक शाळा सुरू झाल्या नाहीत.परंतु शिक्षक मात्र दररोज शाळेवर हजर राहत आहे.शाळेत उपस्थित राहतांना आपल्या आपल्या शाळा परिसरासह वर्ग खोल्याचीही स्वच्छता करण्यात यावी.अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.शाळेतील शिक्षक उपस्थितीत आढावा केंद्रप्रमुख व तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी घेत आहेत.
गंगाधर मोहने
उपशिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग
बॉक्स
तालुका शाळा संख्या शिक्षक संख्या
अचलपूर १२९ ४७४
अमरावती १०८ ४३३
अंजनगाव ८७ २७५
भातकुली ११० ३५८
चांदूर बाजार १२२ ४३४
चिखलदरा १६५ ५२८
चांदूर रेल्वे ६८ २६५
दर्यापूर १२९ ३९६
धारणी १७० ८१७
धामनगाव रेल्वे ८३ ३२५
मोर्शी १०२ ४१९
नांदगाव खंडे. १२४ ४६२
तिवसा ७६ ३०४
वरूड १०६ ४२८
मनपा ०४ ५०