लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : कायदा हा सर्वांसाठी आणि त्याच्यासमोर सर्व जण समान आहेत. मात्र, त्या कायद्याचा सर्वांनी आवश्यकतेच्या वेळी सदुपयोग घेतला पाहिजे, असे मोलाचे मार्गदर्शन तिवसा येथील दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.एन. गिरवलकर यांनी गुरुवारी केले.कृष्णाबाई दंडाळे कन्या व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकअदालत व कायदेविषयक शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे अध्यक्ष म्हणून बोलताना न्या. गिरवलकर यांनी शालेय विद्यार्थिनींना कायदेविषयक माहिती सांगितली. व्यासपीठावर बीडीओ विनोद मेंढे, तालुका आरोग्य अधिकारी ज्योत्स्ना पोटपिटे, पणन महासंघाच्या संचालक छाया दंडाळे, वकील संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद गाडे, प्रमोद राजनेकर, गट शिक्षणाधिकारी धुर्वे, महिला सेलचे सुजित दिंडेकर, मुख्याध्यापिका एम.टी. फाले आदी उपस्थित होते. शालेय जीवनातही शिक्षणातील विविध विषयांतून तुम्हाला कायद्याची माहिती मिळते. भारतीय राज्यघटना ही लिखित स्वरूपाची आहे. त्यात एकूण ५०० कलम व २२ पार्ट आहेत. त्यापैकी भाग-३ या मूलभूत अधिकार कायद्याविषयी माहिती त्यांनी दिली, तर कलम ३५४ या विनयभंग कायद्याविषयी माहिती दिली. यात आरोपीला सात वर्षे शिक्षेची तरतूद असल्याचे ते म्हणाले. शालेय मुलींनी निर्भयतेने कायद्याचा सदुपयोग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, विद्यार्थिनींनी कायदेविषयक शंकांचे निरसन करून घेतले. संचालन बुरघाटे व आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका फाले यांनी केले.
कायद्याचा सदुपयोग सर्वांनी घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 10:18 PM
कायदा हा सर्वांसाठी आणि त्याच्यासमोर सर्व जण समान आहेत. मात्र, त्या कायद्याचा सर्वांनी आवश्यकतेच्या वेळी सदुपयोग घेतला पाहिजे, असे मोलाचे मार्गदर्शन तिवसा येथील दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.एन. गिरवलकर यांनी गुरुवारी केले.
ठळक मुद्देन्यायमूर्ती व्ही.एन. गिरवलकर : तिवसा येथे लोकअदालत