लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागाची तयारी सुरू आहे. या अनुषंगाने आवश्यक ईव्हीएमची जुळवाजुळव सुरू आहे. उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यातून १० हजार ४६९ मतदान यंत्रे येथे आणली आहेत. यांसह जिल्ह्यात बाकी असलेल्या १२ हजार ७९९ मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय चाचणी (एफएलसी) शहरातील विलासनगर स्थित गोदामात सुरू झाली आहे.विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण जसे पेटले आहे, त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाच्या तयारीनेदेखील वेग घेतला आहे. या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागाचीदेखील तयारी सुरू आहे. जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्या अनुषंगाने लागणाºया इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशीनची जुळवाजुळव करण्यात येत आहे. ईव्हीएमच्या निवडणकपूर्व प्रथमस्तर चाचणीसाठी भेल इंडिया कंपनीचे दहा अभियंते येथे दाखल झाले आहेत. किमान दोन आठवडे ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक विभागाद्वारे शासनाच्या सर्व विभागांचे वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे तसेच महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारीदेखील या प्रक्रियेत सहभागी आहेत. निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शी राहावी, ही आयोगाची भूमिका आहे. त्या अनुषंगाने प्रथमस्तर चाचणीकरिता सर्व राजकीय पक्षांना जिल्हा निवडणूक विभागाद्वारे पत्र देण्यात आले. विलासनगरस्थित गोदामामध्ये सुरू झालेली ही मतदान यंत्रांची चाचणी ते पाहू शकतात. दरम्यान, जिल्ह्यात न वापरलेल्या १००८ बीयू, ६०६ सीयू व ६४५ व्हीव्हीपॅट या यंत्रांची चाचणी कंपनीच्या अभियंत्यांद्वारे करण्यात आलेली आहे. चाचणी झालेल्या सर्व यंत्राची सरमिसळ करण्यात येणार आहे व त्यानंतर ही सर्व यंत्रे सबंधित विधानसभा मतदारसंघात पाठविली जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाच्या नायब तहसीलदार नीता लबडे यांनी सांगितले.जिल्ह्यात २६९५ मतदान केंद्रेजिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २६९५ मतदान केंद्रे आहेत. यामध्ये धामणगाव विधानसभा मतदारसंघात ३७५, बडनेरा ३४६, अमरावती ३०६, तिवसा ३२४, दर्यापूर ३४३, मेळघाट ३५५, अचलपूर ३०६ व मोर्शी विधानसभा मतदारसंघात ३२० मतदान केंद्रे आहेत. या प्रत्येक मतदारसंघाव्यतिरिक्त १० टक्के जास्तीची यंत्रे मतदानाच्या वेळी देण्यात येत असल्याने निर्धारित मशीनसाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून जुळवाजुळव सुरू आहे.मतदान यंत्राविषयी गावागावांत जागृतीइलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रात मतदानाची गोपनीयता व सुरक्षितततेविषयी नागरिकांच्या मनात कुठलाही संभ्रम राहू नये, यासाठी सर्व विधानसभा मतदारसंघांतील प्रमुख गावांमध्ये जनजागृती केली जात आहे. यामध्ये नागरिकांना व्हीव्हीपॅट या नवीन प्रणालीविषयी पुन्हा माहिती दिली जाणार आहे. वास्तविक, लोकसभा निवडणुकीत या प्रक्रियेचा नागरिकांकडून वापर करण्यात आला आहे.विधानसभा निवडणुकांसाठी ईव्हीएमची एफएलसी सुरू आहे. यामध्ये सर्व राजकीय पक्षांना पत्र दिले आहे. नागरिकांनादेखील या मशीनच्या वापराविषयी माहिती होण्यासाठी १५ आॅगस्टपासून जनजागृती करण्यात येणार आहे.- शैलेश नवाल, जिल्हा निवडणूक अधिकारी
‘ईव्हीएम’ची चाचणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 1:28 AM
पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागाची तयारी सुरू आहे. या अनुषंगाने आवश्यक ईव्हीएमची जुळवाजुळव सुरू आहे. उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यातून १० हजार ४६९ मतदान यंत्रे येथे आणली आहेत.
ठळक मुद्देतयारी विधानसभेची : सरमिसळ केलेली मतदानयंत्रे संबंधित मतदारसंघाला