लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यापीठांकडून परिपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. साधनांची अडचण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व निर्धोक वातावरणात ऑफलाईन परीक्षेचे नियोजन प्रशासनाच्या सहकार्याचे करण्यात येत आहे. शासन, प्रशासन व विद्यापीठ यांच्या समन्वयाने परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी अमरावती येथे दिली.ना. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची आढावा बैठक विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात झाली. महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, माजी आमदार वीरेंद्र जगताप, कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर आदी यावेळी उपस्थित होते.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान प्रात्यक्षिक व १ ते २६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम परीक्षा होणार असून, मॉक टेस्टचाही अंतर्भाव असेल. ९० ते ९२ टक्के विद्यार्थी परीक्षा ऑनलाईन देणार असून, उर्वरित विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन घेतली जाईल. स्वच्छता, सोशल डिस्टन्स आदी आवश्यक बाबींसाठी जिल्हा प्रशासनाने सहकार्य करावे, असे निर्देश ना. सामंत यांनी यावेळी दिले.याप्रसंगी ना. ठाकूर म्हणाल्या, कोरोना संकटकाळात प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विद्यापीठाचे खूप सहकार्य मिळत आहे. त्याचप्रमाणे परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल.सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती महाविद्यालयांकडून २२ सप्टेंबरपर्यंत संकलित करून २५ सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाला कळविण्यात येणार आहे. त्यानंतर ऑफलाईन परीक्षा घेतली जाईल, असे विद्यापीठाचे परीक्षा विभागप्रमुख हेमंत देशमुख यांनी यावेळी सांगितले.
शासन, प्रशासन, विद्यापीठाच्या समन्वयाने परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 5:00 AM
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान प्रात्यक्षिक व १ ते २६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम परीक्षा होणार असून, मॉक टेस्टचाही अंतर्भाव असेल. ९० ते ९२ टक्के विद्यार्थी परीक्षा ऑनलाईन देणार असून, उर्वरित विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन घेतली जाईल. स्वच्छता, सोशल डिस्टन्स आदी आवश्यक बाबींसाठी जिल्हा प्रशासनाने सहकार्य करावे, असे निर्देश ना. सामंत यांनी यावेळी दिले.
ठळक मुद्देउदय सामंत : नियोजनाबाबत उच्च, तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक