अमरावती: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड साठीच्या परीक्षा येत्या २५ आणि २६ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असून ‘ नयसा कम्युनिकेशन ’ प्रा. लि. चे ५० कार्यकारी सहायकांच्या मदतीने ही परीक्षा घेणार आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ‘क’ साठी ४,०५,१६३ तर गट ‘ड’ साठी ४,६१,४९७ असे एकूण महाराष्ट्रातील ८,६६,६६० परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत. ही भरती प्रक्रिया नयसा कम्युनिकेशन प्रा. लि. ही राबवित असून एकूण ८,६६,६६० उमेदवारांनी नोंदणी केली आहे. तांत्रिक सहायकाच्या मदतीने उमेदवारांच्या नोंदणी प्रक्रियेत उद्भवलेला प्रश्न २४ तासांच्या आत सोडविला गेला आहे. उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया ही २५ दिवस सुरु होती.