वरूड / शेंदूरजनाघाट : सातनूर येथील एका २० वर्षीय युवकाने ६० वर्षीय वृद्धेवर जबरीने अतिप्रसंग केल्याची घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान घडली. पीडिताच्या तक्रारीवरून शेंदूरजनाघाट पोलिसांनी आरोपीला अटक केली. न्यायालयाने त्याला ११ मे पर्यंत ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गोलू सुकलू परतेती (२०, रा. माकोडे यांचे सातनूर शेतातील खोपडी) असे आरोपीचे नाव आहे.
गुरुवारी रात्री ९ च्या दरम्यान आरोपीने पीडिताला दारू पिण्याकरिता दुचाकीने उमरी गावात नेले. तेथे दारू पिऊन परत येताना रस्त्यात दुचाकी उभी करून तिला उमरी सातनूर रोडलगतच्या एका शेतात नेऊन जबरीने अतिप्रसंग केला. याबाबत शेंदूरजनाघाट पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला. ठाणेदार श्रीराम गेडाम पुढील तपास करीत आहेत.