लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने खरीप हंगामातील तालुक्यांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विभागातील पाचही जिल्ह्यांत पात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीसाठी पुढाकार घेतला आहे. हल्ली हिवाळी परीक्षेसाठी या निर्णयाचा लाभ मिळणार नसला तरी उन्हाळी परीक्षा- २०१९ मध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लाभ मिळेल, असे संकेत आहेत.अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची विद्यापीठ, परीक्षा मंडळांची फी माफ केली जाणार आहे. यामध्ये अकृषी विद्यापीठांकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा समावेश असणार आहे. महसूल व वन विभागाने राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती जाहीर केलेल्या १८० तालुक्यांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क माफीसंबंधीची कार्यवाही करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले आहेत. नव्या शासननिर्णयात २६८ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफी मिळणार आहे. अमरावती विभागातील २८ तालुक्यांचा समावेश असणार आहे. तसेच ४७ महसुली मंडळातील समाविष्ट विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.प्राचार्यांशी पत्रव्यवहारदुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्याबाबत विद्यापीठाकडून प्राचार्यांना पत्रव्यवहार करण्यात येत आहे. शसनाने जाहीर केलेल्या तालुक्यातील महाविद्यालीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जिल्हास्तरीय अहवालदेखील पाठविण्याच्या सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत.दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल. एकही विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, अशा सूचना प्राचार्यांना दिल्या आहेत. त्याकरिता परीक्षा विभाग सतर्क आहे.- मुरलीधर चांदेकर,कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:55 PM
शासनाने खरीप हंगामातील तालुक्यांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विभागातील पाचही जिल्ह्यांत पात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीसाठी पुढाकार घेतला आहे. हल्ली हिवाळी परीक्षेसाठी या निर्णयाचा लाभ मिळणार नसला तरी उन्हाळी परीक्षा- २०१९ मध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लाभ मिळेल, असे संकेत आहेत.
ठळक मुद्देमहाविद्यालयात प्रवेशितांना लाभ : विद्यापीठांतर्गत राबविणार उपक्रम