नोंदणी सुरू : महिला आमदारही झाल्यात सदस्यअमरावती : महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासोबतच त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकमत सखीमंचच्या सदस्य नोंदणीला सर्वत्र व्यापक प्रतिसाद लाभत आहे. विदर्भातील पहिल्या महिला आमदार यशोमती ठाकूरसुद्धा सखीमंचच्या सदस्य झाल्या आहेत. मागील १५ वर्षांपासून त्या सखीमंचच्या सदस्यत्व स्वीकारत आहेत. लोकमत सखीमंचचे हे १६ वे वर्ष. या काळात सखींनी मंचावर अतोनात प्रेम करीत मंचाची भक्कम उभारणी केली. हजारोंच्या संख्येने महिला सदस्य झाल्यात.अमरावती शहरात देखील २०१६ सखी मंचची नोंदणी शहरात २० व २१ तारखेला सुरू करण्यात आली. सकाळी १० ते ६ या वेळात शहरातील १८ सेंटरवर सदर नोंदणी सुरू होती. सखींनी शहरातील सर्वच भागात नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद देत नोंदणी केंद्रावर एकच गर्दी केली. २० तारखेला सकाळी १०.३० वाजता लोकमत भवन येथून आमदार यशोमती ठाकूर यांना सदस्यत्वाचे कार्ड देऊन शहरातील प्रथम सखी सदस्य बनण्याचा मान देण्यात आला. या व्यतिरिक्त शहरातील सर्वच केंद्रावर सखींनी महिला मान्यवरांना बोलावून त्यांच्या हस्ते बुथचे उद्घाटन केले. महिलांच्या आग्रहास्तव पुढील काही दिवस लोकमत आॅफीस, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती, सखी मंच सदस्यता नोंदणी ११ ते ६ या वेळात सुरू राहील.
सखी मंचच्या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: February 22, 2016 12:47 AM