लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा नगरपंचायतीकरिता वर्धा नदीत पाणी सोडण्याचे विनापरवानगी आदेश कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी दिलेत. या नियमबाह्य प्रकाराची अधीक्षक अभियंता अनिल बहादुुरे चौकशी करून १५ दिवसांत अहवाल सादर करतील, अशी माहिती सिंचन विभागाचे मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.सिंचन भवनातील बैठकीमध्ये जो प्रकार आमदार यशोमती ठाकूर यांनी केला, हा दबावतंत्राचा प्रकार आहे. तिवसा नगरपंचायतीची डिमांडच नाही. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने दबावात येऊन ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले व त्यानंतर डिमांड घेण्यात आली. आ. ठाकूर यांनी पाणी सोडण्यासाठी दबाव आणून एवढा बाऊ केला, सिंचन विभागाला वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचा आरोप लांडेकर यांनी केला.यावर्षी धरणातील १८५ एमएमएक्यू पाणी वापरले गेले, जे कधीच वापरले जात नाही. मात्र, परिस्थितीच अशी उद्भवली आहे. तिवसा नगरपंचायतीचे अॅग्रिमेंटदेखील योग्य नाही. पाणी वाहून नेण्यासाठी त्यांच्याजवळ पाइप लाइन नाही, दबावात येऊन पाणी सोडण्यात आले. मुळात तिवसा येथील मागणीच नाही. आ. ठाकूर यांचे तिवस्याकरिता पाणी सोडण्याचे पत्रदेखील नाही. त्यांचे पत्र मतदारसंघातील पाणीटंचाईच्या गावांसाठी आहे आणि जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या अखत्यारीतील ती बाब आहे. मला विश्वासात न घेता परस्पर कार्यकारी अभियंत्यांनी हा निर्णय घेतला. हा नियमबाह्य प्रकार आपण थांबविला, अशी माहिती लांडेकर यांनी दिली. आमदारांनी शिवीगाळ केली. याप्रकरणी संघटना जो निर्णय घेईल, तो मान्य असल्याचे ते म्हणाले.काळ्या फिती लावून कामकाजसिंचन भवनातील बैठकीमध्ये आ. यशोमती ठाकूर यांनी मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर यांना शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ सिंचन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काळ्या फिती लावून कामकाज केले. लांडेकर यांनीही काळी फीत लावून पत्रकार परिषद घेतली.जिल्हाधिकाऱ्यांना पाणी सोडण्याचे आधिकार नाहीतऊर्ध्व वर्धा प्रकल्पातील पाणी सोडण्याचे अधिकारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल नाहीत. यासंदर्भात त्यांचे कुठलेही पत्र नाही. त्यामुळे जिल्हाधिकाºयांचा आदेश डावलला नसल्याचे लांडेकर म्हणाले. जिल्हाधिकाºयांकडून पिण्याच्या पाण्याच्या परिमाणाची मागणी आल्यावर अधीक्षक अभियंत्याद्वारे ती विदर्भ पाटबंधारे विभागाला सादर करावी लागते. त्यानंतर महामंडळाद्वारे याविषयी आदेशित करण्यात येते, असे ते म्हणाले.होय, मी आमदार बोंडेंचा नातेवाईकआपण आमदार बोंडेंचे नातेवाईक आहोत, असे रवींद्र लांडेकर म्हणाले. आ. अनिल बोंडे यांनी ऊर्ध्व वर्र्धाचे पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती फोनद्वारे दिली. मात्र, कार्यकारी अभियंत्यांनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नव्हती. त्यांचा हा निर्णय नियमबाह्य असल्याने आपणच पाणी थांबविण्याचे सांगितले. मी पुण्यात असल्याने सकाळी आल्यावर निर्णय घेऊ, असे सांगितल्याचे लांडेकर म्हणाले.पाणी सोडण्यासाठी नगर पंचायतच्या कर्मचाऱ्याचा फोनतिवसा येथे पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे जिल्ह्याधिकाºयांद्वारे आरक्षित पाणी सोडले जावे, असा फोन तिवसा नगरपंचायत कर्मचाºयाकडून आला होता. त्यामुळे प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे म्हणाले. त्यांनी अधीक्षक अभियंत्याचे अधिकार वापरले, जे सध्या लद्दाखमध्ये आहेत. मीदेखील पुण्याला होतो. आमचा कार्यकारी अभियंता फेल ठरला. त्यांनी संबंधित गावांमध्ये दवंडी दिल्यानेच गोंधळ झाल्याचे लांडेकर म्हणाले.
कार्यकारी अभियंत्याच्या चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 1:25 AM
ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा नगरपंचायतीकरिता वर्धा नदीत पाणी सोडण्याचे विनापरवानगी आदेश कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी दिलेत. या नियमबाह्य प्रकाराची अधीक्षक अभियंता अनिल बहादुुरे चौकशी करून १५ दिवसांत अहवाल सादर करतील, अशी माहिती सिंचन विभागाचे मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.
ठळक मुद्देरवींद्र लांडेकर : एसई चौकशी अधिकारी, १५ दिवसात देणार अहवाल