लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत पाचही जिल्ह्यातील महाविद्यालयात कार्यरत तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे थकित वेतन मिळणार आहे. येथील उच्च शिक्षण सहसंचालकांच्या बैठकीत गुरूवारी हा निर्णय घेण्यात आला. शिक्षण मंचच्या पुढाकाराने तासिका तत्वावरील प्राध्यापकांना न्याय मिळाला आहे.अमरावती विद्यापीठ शिक्षण मंचने महाविद्यालय, प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्व स्तरातील अनेक मागण्यांसाठी निवेदने दिली होती. सहसंचालकांनी १५ आॅक्टोनंतर एकही प्रस्ताव वा प्रकरण प्रलंबित असणार नाही, असे ठामपणे मांडले होते. याअनुषंगाने गुरूवारी शिक्षण मंचचे अध्यक्ष प्रदीप खेडकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ व सहसंचालाकांची आढावा बैठक पार पडली.तासिका तत्वावर कार्यरत प्राध्यापकांच्या भावना जाणून घेता थकीत वेतन कुठल्याही परिस्थितीत दिवाळी पूर्वी अदा व्हावे, अशी ठाम मागणी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत सहसंचालकांनी याबाबतीत तत्काळ निर्णय घेऊन पुढील दोन ते तीन दिवसात थकीत वेतनाची रक्कम अदा करण्यात येईल, अशी आनंददायक मान्यता दिली.सेवांतर्गत पदोन्नतीकरिता तज्ञ समिती सदस्य म्हणून आवश्यक शासन प्रतिनिधीची नियुक्ती होण्यास लागणारा कालावधी खुप जास्त असल्याची तक्रार करण्यात आली. ज्या महाविद्यालयांच्या तक्रारी असतील त्यांना काही दिवसातच शासन प्रतिनिधीची नियुक्ती केल्याचे पत्र प्राप्त होईल, न झाल्यास त्यांनी प्रत्यक्ष कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन सहसंचालकांनी केले. पीएच.डी. व एम.फील. वेतनवाढीच्या प्रलंबित तसेच मान्यता दिल्या गेलेल्या प्रस्तावांचा लेखाजोखा मागण्यात आला. याबाबत देखील आॅगष्ट महिन्यापर्यत प्राप्त प्रस्ताव निकाली काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली. प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेची प्रगती बाबतीत स्पष्ट करताना वाशिम, यवतमाळ, बुलडाणा जिल्ह्याचे काम जवळपास पूर्ण झाल्याचे तर अकोला आणि अमरावती जिल्ह्याचे ७० टक्के काम पूर्ण झाल्याचे सहसंचालकांनी सांगितले.वार्षिक वेतनवाढीवर खलजानेवारी ते जुलै या दरम्यान स्थाननिश्चीती झालेल्या प्राध्यापकांना वार्षिक वेतनवाढीचा लाभ नाकारण्यात येत असल्याच्या बाबतीत तीव्र भावना बैठकीत मांडण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न कायम असल्याची बाब उच्च शिक्षण सहसंचालकांच्या पुढ्यात मांडण्यात आली. तासिका तत्वावरील प्राध्यापकांना वार्षिक वेतनवाढ का देण्यात येत नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्राध्यापकांना तासिकांचे थकीत वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 9:49 PM
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत पाचही जिल्ह्यातील महाविद्यालयात कार्यरत तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे थकित वेतन मिळणार आहे. येथील उच्च शिक्षण सहसंचालकांच्या बैठकीत गुरूवारी हा निर्णय घेण्यात आला. शिक्षण मंचच्या पुढाकाराने तासिका तत्वावरील प्राध्यापकांना न्याय मिळाला आहे.
ठळक मुद्देशिक्षण मंचचा पाठपुरावा : उच्च शिक्षण सहसंचालकांच्या बैठकीत निर्णय