शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
2
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
3
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
4
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
5
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
6
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
7
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
8
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
9
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
10
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
11
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
12
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
14
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
15
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
16
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
17
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
18
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
19
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
20
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं

‘कॅरीबॅग’चा बेसुमार वापर

By admin | Published: May 02, 2017 12:43 AM

प्लास्टिक पिशव्यांच्या बेसुमार वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी महापालिका प्रशासन सरसावले असून ....

निर्बंधासाठी महापालिकेचे पथक : २५ हजारांचा दंड, फौजदारीही दाखल होणारअमरावती : प्लास्टिक पिशव्यांच्या बेसुमार वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी महापालिका प्रशासन सरसावले असून त्यासाठी स्वास्थ्य निरीक्षकांसह सिस्टीम मॅनेजर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर (स्वच्छता) जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. शहरात दुकानदार आणि अन्य व्यावसायिकांकडून राजरोसपणे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि वापर होत असल्याच्या पार्श्वभूमिवर आयुक्तांनी ११ एप्रिलला एक आदेश काढून अधिकारी कर्मचाऱ्यांवर नव्याने जबाबदारी दिली आहे. सिस्टिम मॅनेजरने ‘प्लास्टिक बॅन’ नावाने ‘व्हाट्सअ‍ॅप ग्रुप’ तयार करावा. ग्रुपवर प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित प्रभागातील स्वास्थ्य निरीक्षकांनी दंडात्मक जप्तीची कारवाई करावी तथा तक्रारींचे निवारण झाल्यानंतर कार्यपूर्ती अहवाल ग्रुपवर पोस्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वास्थ्य निरीक्षकांनी कारवाई करीत असताना संबंधित व्यावसायिकाकडून प्रथम गुन्ह्याकरिता ५ हजार रुपये, द्वितीय गुन्ह्याकरिता १० हजार तर तृतीय गुन्हा करणाऱ्यांकडून २५ हजार रुपये दंड आकारणी करावी. दंडाची रक्कम न भरल्यास संबंधित व्यावसायिकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. संबंधित व्यावसायिकाने प्रतिबंधित प्लास्टिक कोणत्या व्यक्ती वा प्रतिष्ठानाकडून खरेदी केले, त्याचा शोध घेऊन त्या व्यावसायिकावरही २५ हजार रुपये दंड आणि फौजदारी कारवाई केली जाणार आहे. याशिवाय प्रभागातील कॅरीबॅग विक्रेते, वापर करणारे दुकानदार, व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश एसआयना देण्यात आले आहे. अशी आहे जबाबदारीआरोग्य अधिकारी (स्वच्छता) : झोननिहाय ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षकांच्या अधिपत्याखाली स्वास्थ्य निरीक्षकांचे पथक गठित करण्याची जबाबदारी. सिस्टिम मॅनेजरने ‘बॅन प्लास्टिक’ नावाने व्हाट्स अ‍ॅप ग्रुप तयार करावा, त्यात संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असावा. ग्रुपमध्ये समाविष्ट अधिकाऱ्यांनी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्याा पिशव्यांचा वापर होत असल्याचे आढळल्यास ती तक्रार व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर पोस्ट करावी तर ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षकांनाघाऊक व्यावसायिकांवर २५ हजार रूपये दंड व फौजदारी दाखल करण्याची जबाबदारी पार पाडायची आहेआयुक्तांनी व्यक्त केली खंतशहरातील प्लास्टिक कचऱ्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता निर्गमित आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंत आयुक्तांनी व्यक्त केली आहे. महापालिका क्षेत्रातील दुकानदार फळ, भाजीविक्रेते, व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कॅरीबॅगची विक्री तथा वापर केला जात असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे. जप्ती कशावर?५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या तसेच ८ बाय १२ इंचापेक्षा (२० बाय ३० सेमीपेक्षा) कमी आकार असलेल्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात येतात. महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) अध्यादेश २००६ अन्वये ही कारवाई करण्यात येते.