झेडपीत बैठक : डेप्युटी सीईओंनी दिल्या महत्वाच्या सूचनालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश तट्टे यांनी १४ पंचायत समित्यांमधील विस्तार अधिकारी पंचायत यांचा क्लास घेऊन प्रशासकीय कामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाभरात समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेतील समाजमंदिर, नाली बांधकाम, रस्ते, पाणीपुरवठा योजना आदी कामांचा तसेच वृद्ध कलावंतांचे मानधन यापुढे संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात यापुढे शासनाकडून जमा केले जाणार आहे. त्यासाठी सर्व लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करण्याच्या सूचना विस्तार अधिकाऱ्यांना या बैठकीत डेप्युटी सीईओ तट्टे यांनी दिल्या आहेत. यावेळी इतरही कामांचा आढावा विस्तार अधिकाऱ्यांकडृन घेण्यात आला. बैठकीला विस्तार अधिकारी एस.एस.सगणे, अविनाश सरोदे, एम.एल.मसतकर, एम. ए. सुपले, उलेमाले, रंजना पाथरे, मीना मसतकर यांच्यासह इतर अनेक अधिकारी देखील उपस्थित होते.
विस्तार अधिकाऱ्यांची झाडाझडती
By admin | Published: June 21, 2017 12:07 AM