लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : तालुक्यातील सोमवारखेडा येथून चिखलदरा स्थित देवी पॉइंटवर नवसाचे जेवण करण्यासाठी निघालेल्या प्रवाशांनी करकचून भरलेले प्रवासी वाहन उलटून झालेल्या अपघातात २२ जण जखमी झाले. भरधाव प्रवासी वाहनाला बदनापूर येथील वळणावर मंगळवारी सकाळी ७:५५ वाजता हा अपघात झाला. अपघातग्रस्तांवर तातडीने धामणगाव गढी आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यापैकी काहींना अचलपूर उपजिल्हा रुग्णालय व परतवाडा येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. २२ पैकी सात जण गंभीर जखमी असून एकूण नऊ जणांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. हा अपघात झाल्यानंतर नवसाचे जेवण रद्द करण्यात आले.अपघातामध्ये सोहम दयाराम सावलकर (१०), सविता मनोज मावस्कर (२५), रमेश मंगल भास्कर (३५), दयाराम सावलकर (३०), मनोज मंगल मावस्कर (२२), मंगल मावस्कर (६०), सोनाजी तानु ठाकरे (६०), रामाजी गणेश मावस्कर (३६), अंजली शांताराम काळे (३०), शालीकराम भूसुम (३५), उर्मिला भास्कर (१७), सुदाम लक्ष्मण भास्कर (३५), मोतीराम भूसुम (५०), लखन सुदाम भास्कर (१७), सागर शालीकराम भुसुुम (३०), आकाश अजाबराव मावस्कर (९) आणि लकी अजाबराव मावस्कर (३०, सर्व रा. सोमवारखेडा) अशी जखमींची नावे आहेत. जखमींच्या हात, पाय, डोके आदी ठिकाणी जखमा झाल्या आहेत.सोमवारखेडा येथील हे आदिवासी बांधव एम.एच. ०६ ए.जी. ०९२७ या क्रमांकाच्या प्रवासी वाहनाने चिखलदरा जाण्यासाठी निघाले होते. चालक सुदाम बालाजी बेठेकर (२५, रा. बागलिंगा) याने सोलामुह गावा नजीकच्या उतारवळणावरून वाहन भरधाव हाकले. त्यात त्याचे नियंत्रण सुटून वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. उलटतेवेळी ते रस्त्याने घासत गेल्याने सर्व प्रवासी दूरवर फेकले गेले. अपघाताचा आवाज ऐकताच नागरिक धावले. जखमींना धामणगाव गढी येथील आरोग्य केंद्रात उपचारार्थ भरती करण्यात आले. माजी सरपंच पुष्पा सावलकर, गानू सावलकर, गणेश मावस्कर, रमेश दहिकर, प्रफुल्ल राव, यशवंत बावनकर, धामणगाव गढीचे पोलीस पाटील शोएब शहा, संजय कुºहेकर, चेतन कुºहेकर, राजकुमार सदांशिव आदींनी मदत केली. शालिकराम मोतीराम भूसुम (रा. सोमवारखेडा) यांच्या फिर्यादीवरून आरोपी चालक सुदाम बेठेकरविरुद्ध चिखलदरा पोलिसांनी भादंविच्या २७९, ३३७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार आकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश लाखोडे करीत आहेत.चैत्र महिना लागताच संपूर्ण मेळघाटसह मध्यप्रदेशातील आदिवासी आपले कुलदैवत असलेल्या चिखलदरा येथील देवी पॉइंटवरील जनादेवीच्या मंदिरात ऐपतीप्रमाणे नवस फेडण्यासाठी येतात. आठवड्यातील मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी सर्वाधिक प्रमाणात नवस देण्याची प्रथा आहे. त्यानुसार मंगळवारी सोमवारखेडा येथील शालिकराम भूसुम यांनी कबूल केलेल्या ते नवसाचे जेवण करण्यासाठी जात होते.नवसाचा बोकड दगावलाचिखलदरा येथे जाण्यासाठी भूसूम कुटूंबातील सदस्य एका वाहनात तर दुसऱ्या वाहनात नवसाच्या जेवणासाठी जाणारे गावकरी व बळी दिला जाणारा बोकड होता. या अपघातात २२ जण जखमी झाले, तर त्या बोकडाचा मृत्यू झाला.सदर अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. उर्वरित अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. काहींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.- सुरेश लाखोडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, चिखलदरा
प्रवासी वाहन उलटले, २२ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:51 PM
तालुक्यातील सोमवारखेडा येथून चिखलदरा स्थित देवी पॉइंटवर नवसाचे जेवण करण्यासाठी निघालेल्या प्रवाशांनी करकचून भरलेले प्रवासी वाहन उलटून झालेल्या अपघातात २२ जण जखमी झाले. भरधाव प्रवासी वाहनाला बदनापूर येथील वळणावर मंगळवारी सकाळी ७:५५ वाजता हा अपघात झाला.
ठळक मुद्देचिखलदरानजीकची घटना : सात गंभीर, देवी पॉर्इंटवरील नवसाचे जेवण रद्द