शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
3
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
4
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
5
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
6
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
7
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
8
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
9
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
10
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
11
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
12
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
13
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
14
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
15
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
16
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 
17
नेत्यांची पावले आंतरवालीत, संभाजीराजेंसह शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतली जरांगे यांची भेट
18
...तर हर्षवर्धन पाटील यांची चौकशी करू : मुरलीधर मोहोळ
19
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
20
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!

समाजकल्याण विभाग जात पडताळणीप्रकरणी शुल्कवाढ

By admin | Published: September 07, 2015 12:30 AM

सामाजिक व विशेष सहाय्य विभाग (समाज कल्याण) मध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी आवेदन अर्जाचे शुल्क वाढविण्यात आले आहे.

शासन निर्णय : १ सप्टेंबरपासून अंमलबजावणी सुरूअमरावती : सामाजिक व विशेष सहाय्य विभाग (समाज कल्याण) मध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी आवेदन अर्जाचे शुल्क वाढविण्यात आले आहे. एक सप्टेंबरपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. शासन निर्णयानुसार १५ जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाच्या नागरी सुविधा केंद्रात जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. यामध्ये अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गातील सेवा प्रकरणे, शैक्षणिक प्रकरणे, निवडणूक विषय, इतर प्रयोजनार्थ जाती प्रकरणाची पडताळणी केली जाते. कामकाज जलदगतीने अचूक व्हावे तसेच पारदर्शकता येण्यासाठी नागरी सुविधा केंद्रामार्फत सदर प्रकरणे सादर करून घेतली जात आहे. जात पडताळणी कार्यालयात संगणकीय व एसएमएस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अर्जदाराकडून सेवाशुल्क आकारले जात आहे. सद्यस्थितीत प्रशासकीय खर्च, स्टेशनरी, संगणक, वीज बिल, मानधनमध्ये वाढ झाल्यामुळे जात पडताळणी प्रकरण सादर करून घेताना सेवा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्थेच्यावतीने २६ आॅगस्ट अन्वये एक सप्टेबरपासून सुधारित दर निश्चित करण्यात आले आहे. सुधारित दर भरुनच जात पडताळणीची प्रकरणे नागरी सुविधा केंद्रात द्यावे लागले, अशी माहिती विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक एकचे उपायुक्त भीमराव खंडाते यांनी दिली. शासन निर्णयानुसारच सुधारित शुल्क दर निश्चित करण्यात आले आहे. प्रकरण सादर करताना नागरी सुविधा केंद्रातून पोचपावती घेणे अनिवार्य आहे. दर दिवसाला जाती प्रमाणपत्र पडताळणीची प्रकरणे दाखल केली जातात. निश्चित कालावधीत अर्जदाराला सामाजिक विशेष सहाय्य विभागाच्यावतीने जाती प्रमाणपत्र पडताळणी द्यावी लागते. कामात पारदर्शकता आणण्यासाठी समाजकल्याण विभागाने अनेक उपाययोजना आखल्या आहेत. डिजीटललायझेशननुसार सामाजिक व विशेष सहाय्य विभागाचा कारभार सुरू झाला आहे. या विभागात कामानिमित्य येणाऱ्यांनी शुल्क दर भरल्यास त्याची पावती घेणे आवश्यक असल्याचे खंडाते यांनी प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे. (प्रतिनिधी)सामाजिक न्याय भवनात कार्यालयसमाज कल्याण विभागाचे कार्यालय हे अनेक वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत सुरू होते. मात्र राज्य शासनाच्या धोरणानुसार एकाच इमारतीत अनेक कार्यालय ही संकल्पना अमरावतीत राबविली जात आहे. पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या मागे सामाजिक न्याय भवनात समाज कल्याणचे कार्यालय हलविण्यात आले आहे.जात प्रमाणपत्र पडताळणीचे कामकाज हे नागरी सुविधा केंद्रात केले जाते. वाढता स्टेशनरी, प्रशासकीय खर्च बघता शासनाने जात पडताळणी प्रमाणपत्र अर्जासाठी सुधारित दर निश्चित केले आहे. एक सप्टेंबरपासून त्यानुसार शुल्क आकारले जात आहे.- भीमराव खंडाते,उपायुक्त, जात पडताळणी समिती.