शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

सामाजिक न्यायाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा

By admin | Published: April 15, 2015 12:08 AM

मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी शासनातर्फे विविध सर्वांगीण विकासाच्या योजना राबविण्यात येतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंत्युत्सव : पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे प्रतिपादनअमरावती : मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी शासनातर्फे विविध सर्वांगीण विकासाच्या योजना राबविण्यात येतात. या सर्व योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा उद्योग, राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहराच्या इर्विन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन पालकमंत्र्यांनी अभिवादन केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी दिलीप एडतकर हे होते. महापौर रीना नंदा-कौर, खासदार आनंदराव अडसूळ, जगदीश गुप्ता, वसुधाताई देशमुख, संजय बंड, राजेंद्र गवई, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, सीईओ अनिल भंडारी, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, पोलीस आयुक्त सुरेश मेकला, पोलीस अधीक्षक एस.वीरेश प्रभु, विलास इंगोले, प्रकाश साबळे, बापुराव गायकवाड, सतीश गवई अरुण मोंढे, आयोजन समितीचे अध्यक्ष किशोर बोरकर आदी उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संदेशानुसार आपण सर्वजण शिक्षित झालो आहोत. मोठी पदे मिळालीत. त्याचा लाभ तळागळातील सर्व बांधवांना पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. मोठे स्मारक, पुतळा सुशोभिकरण, परिसर सौदर्यीकरणासाठी सुमारे २ कोटी ५२ लक्ष रुपये लागणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. यापैकी १ कोटी रुपयांचा निधी महापालिका देणार असून जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या निधीतून १ कोटी रुपये देण्यासाठी आपण प्रयत्न करू. लोकवर्गणीतून ३१ लक्ष रुपये उभे करावेत. उर्वरित २१ लक्ष रुपये मी माझ्या आईच्या नावाने देणार असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी यावेळी केली.