आॅनलाईन लोकमतअमरावती : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के राजीव जागांसाठी पहिल्या सोडतीत समाविष्ट झालेल्या बालकांना आता येत्या ४ एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मुदतवाढीचे पत्र जिल्हा परिषदेला पाठविले आहे.वास्तव्य पुराव्यातही दिलासावास्तव्याचा पुरावा म्हणून आई-वडिलांचे आधार कार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, वीजबिल, टेलिफोन बिल, घरभाड्याची पावती, वाहन चालविण्याचा परवाना यापैकी एक ग्राह्य धरण्यात येणार आहे. यापैकी काहीएक नसले तरच दुय्यम निबंधक कार्यालयातील भाडेकरदाराची नोंदणीकृत प्रत वास्तव्याचा पुरावा म्हणून जोडावी लागणार आहे. शिक्षण उपसंचालक शरद गोसावी यांनी तसे पत्र काढले आहे.जिल्ह्यातील एकूण २३३ शाळांमध्ये पहिलीच्या वर्गासाठी तीन हजारांवर जागा राखीव ठेवण्यात आल्या असून, या जागांसाठी ७ हजारांवर अर्ज प्राप्त झाले आहेत. जास्तीत जास्त बालकांना प्रवेश देण्यासाठी तीन टप्प्यांत सोडत काढण्यात येणार आहे. पहिली सोडत १२ मार्च रोजी काढण्यात आली आहे. त्यात हजारो विद्यार्थ्यांचा समावेश झाला असून या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यसाठी २४ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपण्याच्या पूर्वसंध्येला मोजक्याच विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन प्रवेश घेणे शक्य झाले, तर अनेक विद्यार्थ्यांचे पालक पाल्याच्या प्रवेशापासून वंचित आहेत. मुदत संपल्यास त्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागणार असल्याची बाब लक्षात घेऊन प्रवेशासाठी येत्या ४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पालकांनी विनंती केल्यानेच शिक्षण संचालनालयाने मुदतवाढीचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
‘आरटीई’साठी ४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:42 PM
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के राजीव जागांसाठी पहिल्या सोडतीत समाविष्ट झालेल्या बालकांना आता येत्या ४ एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येणार आहे
ठळक मुद्देपालकांना दिलासा : शिक्षण विभागाचा निर्णय