शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

भूखंडांची नियमबाह्य विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 10:26 PM

जुन्या शहरानजीक पाडलेल्या बहुतांश भूखंडांची अटी व शर्तींना मूठमाती देत अनधिकृतरीत्या विक्री सुरू असून, याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत चौकशीची मागणी होत आहे.

ठळक मुद्देअटी, शर्तींना मूठमाती : संबंधित अधिकारी, व्यापाऱ्यांच्या चौकशीची मागणी

सुनील देशपांडे ।आॅनलाईन लोकमतअचलपूर : जुन्या शहरानजीक पाडलेल्या बहुतांश भूखंडांची अटी व शर्तींना मूठमाती देत अनधिकृतरीत्या विक्री सुरू असून, याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत चौकशीची मागणी होत आहे.अचलपूर-परतवाड्यासह कांडली आणि नारायणपूरनजीक सर्वाधिक प्लॉट पाडलेले आहेत. सात वर्षांपूर्वी देवमाळी ही नवीन ग्रामपंचायत उदयास आली. आता मल्हारा गावाकडेही प्लॉट पाडले जात आहेत. ले-आऊट पाडण्यासाठी शेतजमिनीच्या मालकीसंदर्भात कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यापूर्वी शासकीय मान्यतेसाठी महसूल विभागाकडे अर्ज करावा लागतो. अशा जमिनी खासगी व्यक्ती विकत घेतात. परंतु, हा सौदा केवळ एका स्टॅम्पवर करून तो शेतमालक आणि व्यापारी यांच्यातच राहतो. खासगी व्यापारी शेतमालकाला हवी ती रक्कम देऊन शेती नावावर करतो आणि महसूलची मान्यता मिळताच भूखंड पाडले जाते. मात्र, प्लॉटच्या विक्रीसाठी तेथे रस्ते, विद्युतीकरण, खुले मैदानाची सोय होणे अनिवार्य असताना प्लॉटविक्रेता कसलीही सोय न करता थेट प्लॉट विकताहेत. त्यामुळे प्लॉटधारकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही लब्धप्रतिष्ठितांनी गुंतवणुकीच्या हिशेबाने १५ ते २० प्लॉटची खरेदी केलेली आहे. याबाबत कुणी 'ब्र' काढल्यास साम, दाम, दंड पद्धतीने त्याची मुस्कटदाबी केली जाते. त्यामुळे याची चौकशी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.ग्रामपंचायतींवर जबाबदारीतालुक्यातील मोठ्या गावांमध्ये प्लॉटची संख्ये मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना सोयी पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर अधिक ताण पडत आहे. त्यामुळे प्लॉट विक्रीस परवानगी देणाºया अधिकाºयांची चौकशी करण्याची मागणी भाजपा शहर उपाध्यक्ष श्रीधर क्षीरसागर यांनी केली आहे.सुविधांचा अभावदेवमाळी भागातील हनुमाननगर, गुलमोहर कॉलनी, केदारनगरसह आदी ले-आऊटमध्ये रस्ते, नाल्या व इतर सुविधांचा अभाव आहे. जेमतेम ग्रामपंचायतीने हनुमाननगरात रस्त्याची सोय केली खरी; पण नाल्याअभावी सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे, अशी प्रतिक्रिया विवेक मालगे 'लोकमत'शी बोलताना दिली.तुकडे बंदी कायदा लागू असल्याने कृषक जमिनी विकता येते. परंतु अकृषक जमिनी विकता येत नाही, त्यामुळे या कायद्याचा अभ्यास करूनच प्लॉटची खरेदी करावी.- निर्भय जैन, तहसीलदार, अचलपूर