लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या १८ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मतदार केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे. लोकसभा मतदारसंघात २५४ संवेदनशील केंदे्र आहेत. यात पोलीस आयुक्तालयांतर्गत १८४ आणि ग्रामीण भागात ७० केंद्रे आहेत. अतिरिक्त सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव दल (कॅट) एक तुकडी, तर राज्य राखीव दलाचे (एसआरपीएफ) दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत.निवडणूक प्रक्रिया निकोप वातावरण आणि शांततेत पार पाडावी, यासाठी पोलीस प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. यापूर्वीच्या रेकॉर्डनुसार लोकसभा मतदारसंघाची संवेदनशील मतदान केंद्रे सुरक्षेच्या अनुषंगाने ‘टार्गेट’ केली आहेत. अमरावती पोलीस आयुक्तालय क्षेत्रात १८४ केंद्रांवरील सुरक्षा काटेकोरपणे हाताळण्यासाठी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या देखरेखीत ग्रामीण भागातील मतदान केंद्रांची सुरक्षा हाताळली जाणार आहे. अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १० पोलीस ठाणे येतात. अमरावती, बडनेरा व तिवसा विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्र पोलीस आयुक्तालयात येत असून, या तिन्ही विधानसभा क्षेत्रात ७७० पैकी १८४ संवेदनशील केंद्रे आहे. कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने यापूर्वीच अट्टल गुन्हेगारांवर तडीपार, एमपीडीए, प्रतिबंध कारवाई केली आहे. अवैध दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.अतिरिक्त सुरक्षेसाठी यंत्रणा दाखललोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालय हद्दीत ७७० मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी १८४ मतदान केंद्रे संवेदनशील आहे. कायदा व सुव्यस्थेकरिता सीआरपीएफची एक आणि एसआरपीएफचे दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत तसेच २५ पोलीस अधिकारी, १०० पोलीस जवान आणि ५०० होमगार्ड तैनात राहतील.५,८८७ पोलिसांचा बंदोबस्तअमरावती : जिल्ह्यातील ग्रामीण व शहर हद्दीत निवडणुकीच्या अनुषंगाने ५ हजार ८८७ पोलीस बंदोबस्ताला तैनात राहणार आहेत. पोलीस आयुक्त, दोन पोलीस अधीक्षकांसह पोलीस शिपाई, होमगार्ड, एसआरपीएफ व सीआरपीएफच्या कंपन्यांचा या बंदोबस्तात सहभाग राहणार आहे.शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहा ठाण्यांच्या हद्दीतील मतदान केंद्रावर १४७ पोलीस अधिकारी, १ हजार ८०० कर्मचारी, ५०० होमगार्ड यांच्यासह एसआरपीएफच्या दोन व सीआरपीएफची एक कंपनी तैनात राहणार आहे. यामध्ये पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात तीन पोलीस उपायुक्त, आठ सहायक पोलीस आयुक्त, ३८ पोलीस निरीक्षक व ११२ पोलीस शिपायापर्यंत सर्वच यंत्रणा लक्ष ठेवणार आहेत. ग्रामीण क्षेत्रातील मतदान प्रक्रियेसाठी दोन पोलीस अधीक्षक, सात अपर पोलीस अधीक्षक, १५० पोलीस अधिकारी, २ हजार ९८१ कर्मचारी तसेच एसआरपीएफ व सीआरपीएफच्या प्रत्येकी दोन कंपन्या सज्ज राहणार आहेत.प्रशिक्षणशहर पोलीस आयुक्तालयातील ११४ पोलीस अधिकारी, १ हजार ७७२ कर्मचारी व ३९८ होमगार्डना प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्येक बूथवर प्रशिक्षित पोलीस अधिकारी व कर्मचारी सज्ज राहतील.निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सुरक्षेकरिता मनुष्यबळदेखील मिळाले आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष असणार आहे.- संजयकुमार बावीस्करपोलीस आयुक्त, अमरावती.
संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:06 PM
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या १८ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मतदार केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे. लोकसभा मतदारसंघात २५४ संवेदनशील केंदे्र आहेत. यात पोलीस आयुक्तालयांतर्गत १८४ आणि ग्रामीण भागात ७० केंद्रे आहेत. अतिरिक्त सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव दल (कॅट) एक तुकडी, तर राज्य राखीव दलाचे (एसआरपीएफ) दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत.
ठळक मुद्देपोलीस विभागाचा निर्णय : सीआरपीएफची एक, एसआरपीच्या दोन तुकड्या