संस्था
अमरावती
की आखाडा? : राजकीय महत्वाकांक्षेपुढे विद्यार्थ्यांचे कौतुक थिटे : शिवाजी शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य या महत्त्वपूर्ण महाविद्यालयात कला, वाणिज्य शाखेबाबत निकालाच्या दिवशी कमालिचा अनुत्साह दिसून आला. शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांनी ऐन बारावीच्या निकालाच्या दिवशीच विधानसभा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख ठेवल्यामुळे बहुतांश शिक्षकवंृद त्याच कामी व्यस्त होते. शिक्षण
मंडळाने अलिकडे गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची नावे जाहीर करणे बंद केले. प्रत्येक महाविद्यालय विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करतात. सर्वच महाविद्यालयांची तयार झालेली अशी यादी पडताळून मग शहरातील, जिल्ह्य़ातील अव्वल मुलांची अंतिम यादी तयार केली जाते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या नात्यात निकालाचा दिवस महत्त्वाचा व संवेदनशील मानला जातो. आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपैकी कुणी किती गुण प्राप्त केले याचे औत्सुक्य शिक्षकांनाही कमालीचे असते. त्याच औत्सुक्यातून महाविद्यालयांमध्ये टक्केवारी तपासणीचेही कार्य होते. विद्यार्थ्यांचे पेढा भरवून कौतूक केले जाते; परंतु शिक्षणाचे महत्त्व घराघरात रूजविणार्या शिवाजी शिक्षण महाविद्यालयाच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात आज निकालाच्या दिवशी असे काहीच घडले नाही. आमच्या कर्मचार्यांनी निकालाची टक्केवारी बघितली. १00 टक्के निकाल लागला इतकेच मला ठाऊक आहे. गुणवंतांची यादी आम्ही आज तयार केली नाही. निकालाबाबत मी काहीच बघितले नाही. इतर शिक्षकांनाही महाविद्यालयात आज ही यादी तयार करता आली नाही. उद्या आम्ही यादी तयार करू, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य स्मिता देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली. कधिकाळी
विद्यार्थ्यांच्या उज्जवल भवितव्यासाठी झटणार्या शिवाजी शिक्षण संस्थेत आज राजकारणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांमुळे संस्थेला महत्त्व आले त्या विद्यार्थ्यांंच्या शैक्षणिक आयुष्यातला आनंद आज संस्थाध्यक्षांच्या राजकीय महत्वाकांक्षेपुढे म्हणूनच थिटा पडल्याचे कला-वाणिज्य महाविद्यालयातल निरस वातावरणावरून जाणवले.