शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

धारणी बंदला अभूतपूर्व प्रतिसाद

By admin | Published: January 02, 2016 8:29 AM

सर्व जात, धर्म विसरून शहरात शुक्रवारी आठवडी बाजाराच्या दिवशी बंद यशस्वीरीत्या बंद पाळून नागरिकांनी इतिहास घडविला.

व्यावसायिक प्रतिष्ठाने कडकडीत बंद : सर्वपक्षीय नागरिकांचा सहभागधारणी : सर्व जात, धर्म विसरून शहरात शुक्रवारी आठवडी बाजाराच्या दिवशी बंद यशस्वीरीत्या बंद पाळून नागरिकांनी इतिहास घडविला. १६ डिसेंबर रोजी तीन शाळकरी अल्पवयीन आदिवासी मुलींना अल्पसंख्यक समुदायाच्या चार युवकांनी चारचाकी वाहनात बसवून कोलकासच्या जंगलात अतिप्रसंग केल्याप्रकरणी निषेध करण्यासाठी धारणीत बंद पुकारण्यात आले होते. शुक्रवारी सकाळपासून शहरातील सर्वच दुकाने कडकडीत बंद होती. शुक्रवारी सकाळपासूनच तालुक्यातील सर्व गावांतून नागरिक स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात होऊ लागले. दरम्यान सकाळपासून हॉटेल, बीअरबार, हातठेले, किराणा व सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले होते. एपीएमसी यार्डात आमदार प्रभुदास भिलावेकर, माजी आमदार केवलराम काळे, माजी आमदार राजकुमार पटेल, आयोजकांमध्ये रमेश तोटे, हिरालाल मावस्कर, श्रीपाल पाल, मोतीलाल कास्देकर आणि २७ सामाजिक संघटनेचे प्रमुख उपस्थित झाले. यात कोरकू, गोंड, भिलाला, बलई, भावसार, ब्राह्मण, गवळी, गवलान, कलाल, मुस्लिम, मराठा, बंजारी व वसाड समाजाचे जवळपास ५ हजार लोकांनी उपस्थिती दर्शविली. दुपारी १२ वाजता काही प्रमुख वक्त्यांच्या मार्गदर्शनानंतर मूकमोर्चा एपीएमसी यार्डातून निघाला. हा मोर्चा बसस्थानक, पेट्रोलपंप, दयाराम चौक, हनुमान चौक, चर्च रोड, होली चौक, जयस्तंभ चौक मार्गे एसडीओ कार्यालयावर पोहोचला. यावेळी प्रभारी एसडीओ म्हणून तहसीलदार कृष्णा भामकर यांनी निवेदन स्विकारले. त्यांनी निवेदन शासनाकडे पाठविण्याचे व योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. निवेदनात बसस्थानक, म. ना. महाविद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत दोन-दोन पोलिसांची ड्युटी लावण्यासह बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची मागणी केली. जेणेकरून टपोरीबाज मुले व गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आळा बसविण्यास मदत होईल. निवेदन देऊन मोर्चा परत एपीएमसी यार्डात आला. येथे अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले. सुरक्षेसाठी एसडीपीओ सेवानंद तामगाडगे, ठाणेदार सुधीर पाटील, सुधाकर चव्हाण, दिनेश सोनवणे यांनी प्रयत्न केले. यावेळी तीन दंगा नियंत्रण पथकाचे व्हॅन होते. (तालुका प्रतिनिधी)