लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुकुंज मोझरी येथे २३ आॅक्टोबर रोजी उपस्थिती राहणार, अशी चर्चा व्हायरल होत असली तरी अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. यामुळे पंतप्रधानांची उपस्थिती सध्या तरी अस्पष्टच आहे.मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५० वा स्मृतिदिन अर्थात पुण्यतिथी महोत्सव २३ आॅक्टोबरपासून प्रारंभ होईल. आयोजक अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाने पूर्वतयारीस प्रारंभ झाला आहे. नियमित उत्सवाकरिता लागणाऱ्या लक्षवेधी मंडपाची उभारणी उत्सवाच्या एक महिन्यापूर्वीपासून सुरू होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम निश्चित झाल्यास व्यासपीठ, मंडप, व्यवस्था सर्व नियमानुसार करावी लागेल. त्यामुळे पंतप्रधान येणार की नाही, या द्विधा मानसिकतेत आयोजन समिती अडकल्याने नियमित उत्सवाची पूर्वतयारी मंदावली आहे. याबाबत अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे अध्यात्म विभागप्रमुख डॉ. राजाराम बोथे यांच्याशी संपर्क केला असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याचे ते म्हणाले.आश्रमाला मान्यवरांच्या भेटीगुरुकुंज मोझरीत प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, त्यांच्यानंतरचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, शंकरदयाल शर्मा, डॉ. अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, गुलजारीलाल नंदा, प्रथम अर्थमंत्री सी.डी. देशमुख, जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, योगगुरू रामदेव बाबा, अण्णा हजारे आदींनी प्रामुख्याने भेटी दिल्या. महाराष्ट्राच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी आजवर राष्ट्रसंतांच्या आश्रमाला भेट दिली आहे.गुप्तचर यंत्रणेकडून पाहणीकाही दिवसांपूर्वी केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, पोलीस विभागाने मोझरीला भेट देऊन सुरक्षेची पाहणी केली होती. नरेंद्र मोदी यांना येण्याकरिता गुरुकुंज मोझरी येथे दास टेकडी परिसर व तिवसा येथील पोलीस विभागाच्या ऋषीबाबा मंदिराजवळ हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जागा उपलब्ध होऊ शकते.
पंतप्रधानांच्या उपस्थितीवर अनिश्चिततेचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:31 PM
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुकुंज मोझरी येथे २३ आॅक्टोबर रोजी उपस्थिती राहणार, अशी चर्चा व्हायरल होत असली तरी अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. यामुळे पंतप्रधानांची उपस्थिती सध्या तरी अस्पष्टच आहे.
ठळक मुद्देगुरुकुंज मोझरी : २३ आॅक्टोबरपासून पुण्यतिथी महोत्सव