पत्रपरिषदेतच हमरीतुमरी : जिल्हाध्यक्ष निवडीवर आक्षेपअमरावती : संस्थापक अध्यक्षांनी केलेल्या जिल्हाध्यक्षाच्या निवडीवर आक्षेप घेत सरपंच संघटनेचे पदाधिकारी समोरासमोर उभे ठाकले. पत्रपरिषद सुरू असताना हा प्रकार घडल्याने आयोजकांना परिषद गुंडाळावी लागली. सरपंच संघटनेचे संस्थापक गजानन बोंडे यांनी गुरुवारी अमरावतीसह १२ जिल्हाध्यक्षपदाची घोषणा करण्यासाठी ही पत्रकारपरिषद बोलाविली होती. यात हा प्रसंग घडला. जिल्हाध्यक्षपदी बाबाराव दहिकरअमरावती : गजानन बोंडे यांनी सरपंच संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी बाबाराव दहिकर यांची नियुक्ती केली. मात्र, जिल्हा कार्यकारिणीला विश्वासात न घेतल्याचा आरोप जिल्हा प्रसिद्धीप्रमुख गुलाम नबी यांनी केला. गजानन बोंडे, बाबाराव दहिकर यांच्या समवेत नबी हे पत्रपरिषदेच्या व्यासपीठावर विराजमान होते. कार्यकारिणीला विश्वासात घेता, बैठक न बोलावता दहिकरांची केलेली नियुक्ती संस्थापक अध्यक्षांनी रद्द करावी, अशी मागणी नबी यांनी यावेळी केली. पत्रपरिषदेला विदर्भातील पदाधिकारी उपस्थित होते. या प्रकारामुळे सरपंच संघटनेतील दुफळी चव्हाट्यावर आली आहे. अमरावती बाजार समितीच्या निवडणुकीच्यावेळी सरपंच संघटनेने रवी राणा प्रणित शेतकरी संघटना एकता पॅनेलला पाठिंबा दिला होता तर जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी बंड समर्थित पॅनेलमध्ये होते. तेव्हापासून सरपंच संघटनत अंतर्गत धुसफूससुरू होती. ही नियुक्ती करताना मावळते अध्यक्षांचा राजीनामा घेतला गेला नाही किंवा त्यांनी तो दिला नाही, आदी आक्षेप पत्रपरिषदेत घेण्यात आले.
सरपंच संघटनेतील दुफळी चव्हाट्यावर
By admin | Published: October 30, 2015 12:21 AM