लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शीतल पाटील यांचा विहिरीतील मोबाइल शोधण्यास पोलिसांना यश आलेले नाही. वरिष्ठ स्तरावर पाणबुड्यांचा शोध घेतला जात आहे, तर शहर प्रशासन स्तरावर अग्निशमन विभागाशी पत्रव्यवहार करून मदतीची अपेक्षा केली जात आहे. मात्र, आपत्कालीन स्थितीत सज्ज राहून जिवाची बाजी लावणारे अग्निशमन दल विहिरीतून मोबाइल शोधण्यास पुढे आलेले नाही.शीतल पाटील हत्येचे गूढ उकलण्याचे प्रथम आव्हान गाडगेनगर पोलिसांसमोर होते.अग्निशमनकडून अपेक्षापोलीस पाश आवळत असल्याचे पाहून आरोपी सुनील गजभियेने न्यायालयात आत्मसमर्पण केले. रहमान खानलाही अटक करण्यात आली. पोलीस दोषारोपपत्राच्या तयारीत लागले असले तरी शीतल पाटीलचा विहिरीत फेकलेला मोबाइल शोधण्याचे आव्हान कायम आहे. विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी पोलिसांनी १५ ते २० हजारांपर्यंत खर्च केला. मोठ्या मशीनद्वारे पाणी उपसा केला, मात्र, तळ गाठता आले नाही. त्यामुळे पोलिसांनी अग्निशमन, मजीप्रा, महावितरण, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाशी पत्रव्यवहार करून मदत मागितली. मात्र, अद्याप एकही जण पुढे आले नाही. यामध्ये सर्वाधिक अपेक्षा ही अग्निशमनकडून होती. आपत्कालीन स्थिस्तीत जीव पणाला लावणाऱ्या अग्निशमन दलाकडे सर्व आयुधे उपलब्ध एक मोबाइल शोधण्यास ते अद्याप का पुढे आले नाहीत, हा एक संशोधनाचा विषय बनला आहे.१०१ क्रमांक आऊट आॅफ सर्व्हिसआपत्कालीन स्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी अग्निशमन विभागाचा १०१ हा टोल फ्री क्रमांक काही दिवसांपासून ‘आऊट आॅफ सर्व्हिस’ आहे. मार्च महिन्यात अनेक ठिकाणी आगी लागल्या. एप्रिल महिन्यातही उन्हाचा प्रकोप वाढणारच आहे. मात्र, ‘१०१’ बंद असल्यामुळे मदत मिळणे कठीण झाले आहे.पाणी काढण्यासाठी पोलिसांनी वेळ ठरवून द्यावा. त्यांनीही उपस्थित राहावे. अग्निशमनमधील पोहणाºया जवानांकडून मोबाइलचा शोध घेतला जाईल. अधिकाºयांना निर्देश दिले आहे.- हेमंतकुमार पवार, महापालिका आयुक्त
शीतलचा मोबाईल शोधण्यात अपयश का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:38 AM
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शीतल पाटील यांचा विहिरीतील मोबाइल शोधण्यास पोलिसांना यश आलेले नाही. वरिष्ठ स्तरावर पाणबुड्यांचा शोध घेतला जात आहे, तर शहर प्रशासन स्तरावर अग्निशमन विभागाशी पत्रव्यवहार करून मदतीची अपेक्षा केली जात आहे. मात्र, आपत्कालीन स्थितीत सज्ज राहून जिवाची बाजी लावणारे अग्निशमन दल विहिरीतून मोबाइल शोधण्यास पुढे आलेले नाही.शीतल ...
ठळक मुद्देअग्निशमन कुचकामी : पोलिसांचा पत्रव्यवहार