अमरावती : जिल्ह्यातील लाभार्थ्याना विविध योजनांचा थेट लाभ देणारी शासकीय योजनांची एक अभिनव अशी जत्रा जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. १५ जूनपर्यंत चालणाऱ्या जत्रा शासकीय योजनांची... सर्वसामान्यांच्या विकासाची' या अभियानात जिल्ह्यातील ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ दिला जाणार आहे.
राज्य शासनाकडून जनकल्याणाच्या अनेक योजना राबविल्या जातात. मात्र, त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये जाणे, योजनांची माहिती घेणे आवश्यक कागदपत्रे विविध कार्यालयात जाऊन जमा करणे अधिकामे करावी लागतात. दस्तऐवज उपलब्ध करून देणारी ही कार्यालय वेगवेगळे ठिकाणी असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागते. कित्येक वेळा लोकांना शासनाच्या बऱ्याच योजनांची माहिती नसते. माहिती अभावी या योजनांचा लाभ गरजू व्यक्तींपर्यत पोहोचू शकत नाही. योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्याना मिळावा या उद्देशाने राज्य शासनाकडून काही निवडक ताुलक्यात मध्ये जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांचे विकासाची हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमात एकाच ठिकाणी नागरिकांना शासनाच्या विविध जवळपास १७ योजनांचा लाभ कमीत कमी कालावधी देण्यात येणार आहे. या अभियानात नागरिकांना शासकीय योजनांशी निगडित कार्यालयाचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देणार आहेत.
अंमलबजावणीसाठी नियोजन.....
केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आढावा घेऊन या उपक्रमांतर्गत राबवण्याच्या योजनांचे जिल्हानिहाय उद्दिष्ट ठरवण्यात आले. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना आढावा बैठकीत सुचना दिल्या आहेत. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही सहभागी करून घेण्यात आले. त्यानुषंगाने विविध स्तरांवरील जबाबदाऱ्यांचे सोपवून योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून अर्ज भरून घेणे ते लाभार्थ्यांची निवड आणि प्रत्यक्ष लाभ देणे इथपर्यत जबाबदारी निश्चित केलेली आहे.
शासकीय योजना सुलभीकरण अभियानांतर्गत जिल्ह्यात शासकीय योजनांचा जत्रा आयोजित करण्यात येत आहे. ही जत्रा यशस्वी करण्यासाठी झेडपी व महसुल यंत्रणा समन्वयाने काम करत आहे. विविध शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी महिला व बालकल्याण,आरोग्य,समाजकल्याण व अन्य विभागाचे प्रमुखांना सूचना दिल्या आहेत. या अभियानाचा लाभ जिल्हावासीयांनी घ्यावा.
- अविश्यांत पंडा, सीईओ जिल्हा परिषद अमरावती