अविनाश रोकडे (४८, रा. हनुमान वाॅर्ड, पुसद) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी एक महिला व नरेंद्र वासुदेव फुंडकर (रा. दस्तुरनगर) या दोघांविरुद्ध भादंविचे कलम ४२०, ४०६, ४६५, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींनी अविनाश रोकडे व त्यांचा मित्र योगेश यांना नोकरीचे आमिष दाखविले. आपली प्रचंड ओळख आहे, मात्र त्यासाठी पैसे द्यावे लागतील, अशी बतावणी करण्यात आली. फुंडकर व त्या महिलेने रोकडे व त्यांच्या मित्राला नोकरीचे बनावट नियुक्तिपत्र दिले. दोघांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेण्यात आले. ती रक्कम फुंडकरच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आली. मात्र, संबंधित ठिकाणी गेल्यानंतर ते नियुक्तिपत्र बनावट असल्याचे लक्षात आले. त्यामुळे दोघांनीही फुंडकर व त्या महिलेला रक्कम परत मागितली. मात्र, ती देण्यास नकार देण्यात आला. सरतेशेवटी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविण्यात आली.
बनावट नियुक्तिपत्र, १६ लाखांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:12 AM