शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

आदिवासी विभागाच्या नावाने बनावट नोकरभरती; सायबर ठाण्यात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:10 PM

आदिवासी विकास विभागाच्या नावाने नोकरभरतीची बनावट जाहिरात व्हायरल झाली असून, उमेदवारांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे: महा ऑनलाइन पोर्टलवर जाहिरात, शुल्कही मागविले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आदिवासी विकास विभागाच्या नावाने नोकरभरतीची बनावट जाहिरात व्हायरल झाली असून, उमेदवारांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. याबाबत आदिवासी विभाग प्रशासनाने सायबर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.दोन दिवसांपासून व्हॉट्सअप, इन्स्टाग्रामवर आदिवासी विकास विभागात नोकरभरती असल्याची बनावट जाहिरात व्हायरल होत आहे. ‘आदिवासी विकास विभाग आयुक्तालय’च्या नावाने ही जाहिरात व्हायरल होत आहे. मात्र, व्हायरल झालेली पोस्ट आणि लिंक हे बनावट असल्याचे समोर आले आहे. ही वेबसाइट आणि त्यातील मजकूर हा आदिवासी विकास आयुक्तालयाच्या मूळ वेबसाइटप्रमाणे तयार करण्यात आला. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला ही वेबसाइट खरी आहे की खोटी, हे कळणार नाही.३ हजार १९९ जागांसाठी नोकरभरतीचा उल्लेख या फेक वेबसाइटवर करण्यात आला आहे. सिव्हिल इंजिनीअर, इलेक्ट्रिक इंजिनीअर, सिव्हिल इंजिनीअर असिस्टंट, सुपरवायझर, लॅबोरेटरी असिस्टंट, शिपाई अशा सहा विभागांमध्ये भरतीची जाहिरात काढण्यात आल्याचे यात दर्शविले आहे. मुंबईत १०३१, पुण्यात ८६६, नाशिकमध्ये ७२४, जळगावात ५७८ अशी जिल्हानिहाय पदे प्रसिद्ध करुन ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. खुल्या प्रवर्गाला ५०० रुपये तर, इतरांसाठी ३५० रुपये शुल्क ऑनलाइन मागविण्यात आले असून, यात बेरोजगार तरूणांची फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता, वेबसाइट तपासणीसाठी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.कोणीतरी हे कृत्य खोडसाळपणे, गैरहेतुने केले आहे. आदिवासी विभागाची बदनामी करण्याच्या दृष्टीने अशी खोटी जाहिरात प्रसिद्ध केली. याबाबत पोलिसांच्या सायबर ठाण्यात शुक्रवारी तक्रार दाखल केली आहे.- विनोद पाटील, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम