लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चिमुकल्यांना नीतिमत्तेचे धडे देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ६० गुरुजींनी स्वत:ची बदली करून घेण्यासाठी खोटेपणाचा कळस गाठला. बदली अर्जासोबत अंतराचेच नव्हे, तर अपंगत्वाचेही खोटे प्रमाणपत्र जोडल्याच्या तक्रारी झेडपीकडे प्राप्त झाल्या होत्या. तपासणी अहवालात दोषारोप ठेवलेल्या शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी मंगळवारी सुनावणीसाठी जिल्हा परिषदेत पाचारण केले होते. या सुनावणीत ६० पैकी ५९ शिक्षकांनी हजेरी लावली. झेडपीच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडलेल्या सुनावणीला सीईओ मनीषा खत्री, शिक्षणाधिकारी जयश्री राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले, डॉ. रहाटे, परीविक्षाधीन अधिकारी मिताली शेट्टी व संबंधित पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.२९६६ शिक्षकांना आॅनलाइन बदली प्रक्रियेत पुढील ठिकाणी रुजू होण्याचे आदेश मिळाले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील संवर्ग १ व संवर्ग २ मध्ये ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या, त्यात काहींनी अंतर खोटे दाखविले, तर काहींनी बोगस प्रमाणपत्र जोडल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे दाखल केल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत खोटे प्रमाणपत्र असल्याचे आढळून आले.दरम्यान, बदलीच्या पोर्टलवर खोटी माहिती भरणाºया ६० शिक्षकांना जि.प. शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात कारणे दाखवा नोटीस बजाविली. नोटीस बजावलेल्या व वेळेवर आलेल्या तक्रारी नुसार ६० शिक्षकांची सीईओंनी सुनावणी घेतली. बदली प्रक्रियेत अनेकांनी अंतराचे, आजारपणाचे तसेच अंपग असल्याचे प्रमाणपत्र जोडले आहेत. मात्र, बदलीसाठी जोडलेले प्रमाणपत्राची सत्यता सादर करू न शकल्याने सुनावणीत पडताळणीअंती ६० शिक्षकांपैकी बहुतांश शिक्षक दोषी आढळून आले. सोईची बदली मिळविण्यासाठी संवर्ग १ आणि संवर्ग २ मध्ये खोटी माहिती दिल्याचे पडताळणीअंती आढळून आले. यातील ६० शिक्षकांची सीईओ मनीषा खत्री यांच्यासमोर सुनावणी घेतली. यात संबंधितांनी जोडलेल्या प्रमाणपत्राचे ठोस पुरावे सीईओंसमक्ष सादर करू न शकलेल्या बऱ्याच शिक्षकांची पोलखोल सुनावणीत झाली आहे. त्यामुळे या शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार कोसळणार आहे.एसटीच्या अंतराचा पुरावा धुडकावलासोईच्या बदलीसाठी काही शिक्षकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या संबंधित एसटी डेपो मॅनेजरच्या स्वाक्षरीने अंतराचा पुरावा जोडलेला आहे. मात्र, हा पुरावा सीईओंनी अमान्य केला. यावर ज्या शिक्षकांनी असे प्रमाणपत्र जोडले, त्यांनी एक तर प्रवास भाड्याचे तिकीट अथवा एसटी बसची पास दाखवावी, असे बजावले. यावर बोटावर मोजण्याइतकेच शिक्षक पुरावे देऊ शकले. इतर पुरावे न देणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.६० पैकी ५९ शिक्षकांची सुनावणी घेतली. दोषींवर शिस्तभंगाची कारवाई होईल, शिवाय गंभीर प्रकरणी बडतर्फीची शिफारस शासनाकडे केली जाईल. ही कारवाई १० जुलैपूर्वी पूर्ण करू.- मनीषा खत्रीमुख्य कार्यकारी अधिकारीखोटी माहिती देऊन संवर्ग १ व २ मध्ये बदलीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांची सुनावणी झाली. याप्रकरणी शिस्तभंग कारवाई व बदली रद्द करून सीईओंच्या आदेशानुसार एक वेतनवाढ कायमची बंद करण्याची कारवाईसुद्धा करू.- जयश्री राऊत,प्रभारी शिक्षणाधिकारी प्राथमिक
खोटी माहिती, दोषी शिक्षकांवर शिस्तभंग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 11:00 PM
चिमुकल्यांना नीतिमत्तेचे धडे देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ६० गुरुजींनी स्वत:ची बदली करून घेण्यासाठी खोटेपणाचा कळस गाठला. बदली अर्जासोबत अंतराचेच नव्हे, तर अपंगत्वाचेही खोटे प्रमाणपत्र जोडल्याच्या तक्रारी झेडपीकडे प्राप्त झाल्या होत्या. तपासणी अहवालात दोषारोप ठेवलेल्या शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी मंगळवारी सुनावणीसाठी जिल्हा परिषदेत पाचारण केले होते. या सुनावणीत ६० पैकी ५९ शिक्षकांनी हजेरी लावली.
ठळक मुद्देसीईओंसमोर पेशी : बोगस अपंग प्रमाणपत्राची डीएचओकडून तपासणी