आॅनलाईन लोकमतअमरावती : घर-दार सोडले... दहा वर्षांपासून पायाला भिंगरी लागल्यागत भटकंती... कुणीही मनोरुग्ण म्हणून टाळेल... मात्र, सोमवारी त्याचे नशीब खुलले. शहरात भटकंती करणाऱ्या या ५० वर्षीय इसमाला स्माइल फाऊंडेशनच्या पुढाकाराने अखेर कुटुंबाचे सान्निध्य मिळाले.गणेश अंबादास उखळकर असे या इसमाचे नाव आहे. तो शहरातीलच मारोतीनगर येथील रहिवासी आहे. स्माईलच्या पदाधिकाऱ्यांनी घाणेरड्या स्थितीत भटकणाऱ्या या इसमाचे रूपडे पालटल्यानंतर राजापेठ पोलिसांच्या मदतीने त्याला कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले.स्माईल फाऊंडेशनच्या निकिता गावंडे व त्यांच्या सहकाºयांना सोमवारी जयस्तंभ चौकात ५० वर्षीय इसम भटकंती करताना आढळून आला. दाढी वाढलेली, अंगावरील कळकट कपडे अशी त्याची स्थिती होती. त्याने गणेश उखळकर असे नाव सांगितले. स्माइलच्या पदाधिकाऱ्यांना यामुळे हुरूप आला. त्यांनी गणेश यांची आंघोळ घालून स्वच्छ केले. त्यांची वाढलेली दाढी व डोक्यावरील न्हाव्याकडून काढले. यामुळे गणेश उखळकर यांचा चेहरा सर्वसामान्य दिसायला लागला. यानंतर मोहीम पत्ता, आप्तांना शोधण्याची.स्माइल फाऊंडेशनने यासाठी राजापेठ पोलिसांची मदत घेतली. ठाणेदार किशोर सूर्यवंशी यांनी तत्काळ दखल घेत पोलीस शिपाई नरेंद्र सोनोने व अमोल वाहाणे यांना कामी लावले. चौकशीअंती गणेश उखळकर हे मारोतीनगरातील हनुमान मंदिराजवळ राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. निकिता गावंडे व राजापेठ पोलिसांनी गणेश उखळकर यांना सोमवारी रात्री त्यांच्या कुटुंबीयांपुढे उभे करताच, तेसुद्धा अचंबित झाले. इतक्या वर्षांनंतर आपला माणूस घरी परतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकला. त्यांनी राजापेठ पोलीस व स्माइल फाऊंडेशनचे आभार मानले.स्माईलने खुलविले हास्यकुटुंबीयांपासून दूर गेलेले, अनाथ, निराधार, मुलांनी घरातून हाकलून लावलेले असे अनेक नागरिक शहरात भटकंती करतात. त्यांची चौकशी करून त्यांना घरापर्यंत पोहचविण्याचे कार्य स्माइल फाऊंडेशन करते.तो इसम दहा वर्षांपासून भटकत होता. स्माइल फाऊंडेशनने त्याला निटनेटके करून पोलिसांच्या मदतीने कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.- किशोर सूर्यवंशी,ठाणेदार, राजापेठ
दशकापासून भटकंती करणाऱ्याला मिळाले कुटुंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 10:48 PM
घर-दार सोडले... दहा वर्षांपासून पायाला भिंगरी लागल्यागत भटकंती... कुणीही मनोरुग्ण म्हणून टाळेल... मात्र, सोमवारी त्याचे नशीब खुलले. शहरात भटकंती करणाऱ्या या ५० वर्षीय इसमाला स्माइल फाऊंडेशनच्या पुढाकाराने अखेर कुटुंबाचे सान्निध्य मिळाले.
ठळक मुद्देस्माईल फाऊंडेशनचा पुढाकार : घाणेरड्या स्थितीतून पालटले रूपडे