शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

तळेगावातील सुप्रसिद्ध शंकरपट होणार सुरू; बैलगाडा धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 1:35 PM

बंदीमुळे १५० वर्षांपासून सुरू असलेला शंकरपट इतिहासजमा होईल का, असा प्रश्न तळेगाववासीयांना भेडसावत होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने परवानगी देऊन बंदी उठवल्याने १५ जानेवारीला शंकरपट त्याच जल्लोषात भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देन्यायालयाने बंदी उठवल्याने शंकरपटप्रेमी व गावकऱ्यांमध्ये आनंदोत्सव

नीलेश रामगावकर 

अमरावती : धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर हे 'पटाचे तळेगाव' म्हणून पश्चिम विदर्भात ओळखले जाते. विदर्भात तळेगाव नावाची अनेक गावे आहेत. तरीही तळेगाव म्हटले की, पटाचे तळेगाव हे नाव प्रकर्षाने पुढे येते. त्याची ओळख पुसली जाते की काय, असे वाटत असताना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने सर्शत परवानगी दिली व निर्णय घटनापीठाकडे सोपविला. या निर्णयामुळे गावात जल्लोष व्यक्त होत आहे.

शेतातील कामे हातावेगळी झाली की, मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून येथे शंकरपट जात होता. शंकरपट म्हणजे बैलजोड्यांची शर्यंत. परंतु, गेल्या सात वर्षांपासून शंकरपटावर घातलेल्या बंदीमुळे १५० वर्षांपासून सुरू असलेला शंकरपट इतिहासजमा होईल का, असा प्रश्न तळेगाववासीयांना भेडसावत होता. मात्र, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने शंकरपटावरील सशर्त परवानगी देऊन बंदी उठवल्याने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ जानेवारीला तळेगाव येथील १५० वर्षांची परंपरा असलेल्या शंकरपट त्याच जल्लोषात भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. न्यायालयाने परवानगी देत बंदी उठवली. या निर्णयामुळे तळेगावात आनंद व्यक्त होत आहे.

तळेगाव दशासर येथील हा पट शेतकऱ्यांसाठी तसेच गावकऱ्यांसाठी एक उत्सवच असतो. हा शंकरपट पाहण्याकरिता पंचक्रोशीतून लोक येत असतात. त्यामुळे येथील व्यवसायाला चालना मिळते, या शंकरपटात सुसाट वेगाने पळणारी रिंगी वजनाने अत्यंत हलकी असते. शर्यतीच्या धावपट्टीच्या बाजूने विशिष्ट अंतरावर दोन खांब असतात. व त्याला धागा बांधलेला असतो, पहिला धागा तोडला की, घड्याळ सुरू होते व दुसरा धागा तोडला की घड्याळ बंद पडते. त्या दोन धाग्यांमधून धावतानाच्या नेमक्या वेगाची या घड्याळात नोंद होते. जी जोडी कमी वेळात अंतर कापेल, ती जोडी विजयी ठरते, या शंकरपटासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आणून बैलजोड्या या स्पर्धेत खेळविल्या जातात आपल्या कोठ्यात दावणीच्या सर्जा-राजावर जिवापाड जपणारा शेतकरी बैलगाडा शर्यतीसाठी अक्षरशः वेडा होतो.

सर्वोच्च न्यायालयाने शंकरपटावरील बंदी उठवल्याने या निर्णयाचे स्वागतच आहे. शंकरपट हा शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे उत्सव आहे. शंकरपट पूर्ववत सुरू होण्याने गावातील जनतेला आर्थिक चालना मिळेल.

- भरत लोया, प्रगतिशील शेतकरी, तळेगाव दशासर

टॅग्स :Bull Cart Raceबैलगाडी शर्यतSocialसामाजिकFarmerशेतकरीagricultureशेती