तिवसा (अमरावती) : तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात झाडाला दोर बांधून गळफास घेतला. आत्महत्येची ही घटना सोमवारी कुºहा शिवारात घडली. भारत सिंगाडे (५५, रा.कुºहा) मृताच्या दोन्ही मुलाचे २५ व २७ फेब्रुवारी रोजी विवाह आहेत. संतोष व पुरुषोत्तम या मुलांच्या लग्नाच्या पूर्वसंध्येला शेतात जाऊन जीवनयात्रा संपवली. मृत शेतकºयाने गळफास घेण्यापूर्वी स्वत:च्या चपला लटकविल्या होत्या.
मुलांच्या लग्नाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 2:53 AM