शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

दर ३२ तासांत एक शेतकरी आत्महत्या : गतवर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक २९ प्रकरणे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 7:11 PM

नापिकी अन् नैसर्गिक आपत्ती शेतक-यांच्या पाचवीलाच पुजली आहे. यामुळे झालेले कर्ज अन् जगावं कसं, या विवंचनेने शेतकरी नैराश्याच्या गर्तेत आहे.

अमरावती : नापिकी अन् नैसर्गिक आपत्ती शेतक-यांच्या पाचवीलाच पुजली आहे. यामुळे झालेले कर्ज अन् जगावं कसं, या विवंचनेने शेतकरी नैराश्याच्या गर्तेत आहे. यातून सावरण्यासाठी झालेले शासनप्रयत्न निष्फळ ठरल्याने जिल्ह्यात दर बत्तीस तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. वर्षभरात २६० शेतकरी आत्महत्या झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.जिल्ह्यातील शेतकरी सलग पाच वर्षांपासून दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकला आहे. यापूर्वीच्या शासनाने दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी झाली केली. मात्र, अटी व शर्तीमध्ये अनेक शेतकरी कर्जबाजारी राहिलेत. मुला-मुलींचे शिक्षण, लग्न आदींमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. यंदादेखील खरिपाच्या दोन महिन्यांत पावसात खंड पडल्यामुळे मूग व उडीद बाद झाले. त्यानंतर सोयाबीनच्या हंगामात १० दिवस अवकाळी पावसाने ‘कॅश क्रॉप’ची दैना केली. कपाशीचेही नुकसान झाले. एकूण ८० टक्के हंगाम बाधित झाला. त्यातुलनेत शासन मदत अल्प आहे. त्यामुळे खासगी सावकारांचे कर्जदेखील मोठ्या प्रमाणात होत असल्याने कर्जाच्या तगाद्यामुळेही शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे चित्र दुर्दैवी आहे. शेतकरी आत्महत्यांची नोंद १ जानेवारी २००१ पासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली जाते. त्यानुसार आतापर्यंत ३ हजार ८१७ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये १६९९ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरलीत. २०४६ अपात्र, तर अद्यापही ७२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. शेतकरी आत्महत्यासारख्या गंभीर विषयावर प्रशासन संवेदनशील नाही. त्यामुळेच तब्बल तीन महिन्यांपासूनच्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला अद्यापही शासन मदत मिळू शकली नाही, हीदेखील तितकीच धक्कादायक बाब आहे.

सन २००१ पासून ३८१७ शेतकरी आत्महत्याजिल्ह्यात १९ वर्षांत ३८१७ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ३६२ आत्महत्या या ऑगस्ट महिन्यात झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात २८७, फेब्रुवारी ३०९, मार्च ३२८, एप्रिल २६५, मे ३२५, जून २९२, जुलै ३०७, सप्टेंबर ३६२, ऑक्टोबर ३३४ नोव्हेंबर ३२२ व डिसेंबर महिन्यात ३१४ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले. यंदा २६० शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. याध्ये जानेवारी महिन्यात २०, फेब्रुवारी १९, मार्च २४, एप्रिल १७, मे २५, जून २०, जुलै २२, ऑगस्ट २९, सप्टेंबर २८, आॅक्टोबर १८, नोव्हेंबर २३ व डिसेंबर महिन्यात १९ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले.