लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी (अमरावती) : तालुक्यातील दहिगाव रेचा येथील गणेश मोहन रेचे (४०) या शेतकऱ्याचा २९ एप्रिल रोजी नागपूरच्या मेयो इस्पितळात ‘स्वाईन फ्लू’मुळे मृत्यू झाला. अचानक ताप आल्याने त्यांना ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. नंतर ‘स्वाईन फ्लू’चा संशय आल्याने त्यांना तातडीने नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वृद्ध पित्यासह मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
‘स्वाइन फ्लू’ने शेतकऱ्याचा मृत्यू
By admin | Published: May 06, 2017 3:46 AM