अमरावती : बाजारपेठेमधील स्पर्धात्मक वातावरणांचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर शेतकर्यांचे संघटन करुन व आदर्शवत शेती पद्धतीचा वापर करुन उत्पादन व विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्या अनुषंगाने शेती आधारित व शेती संलग्न उद्योगांना चालना देण्यासाठी शेतकर्यांच्या समूह, गट शेतीचा उपक्रम कृषी विभागाद्वारा यंदा राबविण्यात येणार आहे. शेतकर्यांची कमी होत असलेली शेती जमीन धारणा, शेतीसाठी भांडवल पुरवठय़ास येत असलेल्या र्मयादा, तांत्रिक कारणास असलेला अपुरा वाव, तसेच जमिनीची कमी होत जात असलेली उत्पादकता व सद्यस्थितीमध्ये कृषी विस्तारास असणार्या र्मयादा आदी सर्व अनुषंगिक बाबीचा विचार करुन गट शेतीस चालना देण्याचा शासनाचा हा उपक्रम आहे. शेतकर्यांच्या समूह व गट शेतीस चालना देण्यासाठी राज्य शासनाची १00 टक्के पुरस्कृत योजना आहे. शेतकर्यांचे समूह तयार करुन समूह शेतीद्वारे ही योजना राबविण्यात येत आहे. सन २0१४-१५ चा आर्थिक वर्षात राज्यामधील ३३ जिल्हय़ात राबविण्यात येत असून याकरिता ५0 लक्ष रुपये शासनाने मंजुर केले आहे. सन २0१४-१५ शेतकर्यांच्या समूह, गट शेतीस चालना देणार्या या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संचालक (आत्मा) यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. शेतकरी समुहाला लागणारे प्रशिक्षण, कौशल्य वृध्दी, श्ेातकरी अभ्यास दौरा, प्र-क्षेत्र भेटी, शास्त्रज्ञ मार्गदर्शन, शेतमाल उत्पादन व शेती आधारीत उद्योगांना चालना देणे व त्याचा दर्जा वाढविणे आणि या व्दारेच उत्पादनास अधिकाधिक भाव मिळावा हा समूह गट शेतीस प्रोत्साहन देण्यामागच्या योजनेचे उद्देश आहे. (प्रतिनिधी)
शेतकर्यांच्या समूह शेतीचा उपक्रम यंदाही
By admin | Published: May 29, 2014 1:36 AM